शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

असा झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, लक्झरी रूममध्ये परदेशी मुली; सोशल मीडियावरून ग्राहक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2021 7:03 PM

1 / 9
गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. लखनऊ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या सेक्स रॅकेटचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती.
2 / 9
लखनऊ पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या सेक्स रॅकेटचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी केली जात होती. यानंतर व्हॉट्सऍपच्या माध्यमातून परदेशी मुलींना ग्राहकांशी संपर्क साधून लक्झरी रूममध्ये पुरवले जात होते.
3 / 9
ग्राहकांची ओळख कोणत्याही प्रकारे उघडकीस येऊ नये म्हणून हॉटेलमध्ये त्यांचे नाव व ओळख लपवण्यात आली होती.
4 / 9
चिनहटच्या विकल्पखंडमध्ये सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी येथील लक्झरी इन हॉटेलमध्ये छापा टाकून दहा जणांना परदेशी मुलींसह अटक केली.
5 / 9
गोमती नगरचे डीसीपी संजीव सुमन यांनी राजा नावाची व्यक्ती देशी-परदेशी महिलांबरोबर सेक्स रॅकेट चालवित असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, पोलिस पथकाने दोन उझबेकिस्तान, चार दिल्लीच्या मुलींना अटक केली आहे.
6 / 9
हॉटेलच्या मालक आणि व्यवस्थापकालाही पोलिस पथकाने अटक केली आहे.
7 / 9
पोलिसांच्या या कारवाई दरम्यान लोक हॉटेलच्या अनेक खोल्यांमध्ये थांबले होते. इथल्या पोलिसांना पाहून घाबरुन गेले. झटापटीत चार तरुण घटनास्थळावरून पळून गेले.
8 / 9
पोलिसांनी हॉटेलमधून रजिस्टर व इतर अनेक कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
9 / 9
फरार आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी करत आहेत.
टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश