शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मृत समजून कुटुंबाने अंतिम संस्कार केले; तीन वर्षांनी प्रेमी जिजूसोबत पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 19:08 IST

1 / 10
पैसा आणि प्रेमापोटी कोण काय करेल सांगता येत नाही. प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत बिहारच्या एका तरुणीने जे केले ते वाचून हैरान व्हायला होईल. पतीसोबत काही कारणावरून वाद झाल्याने माहेरी आलेल्या महिलेने जे काही कृत्य केले ते पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
2 / 10
माहेरी आलेली महिला काही दिवसांनी तिथून गायब झाली. या काळात देवराढमध्ये एका वाहत्या नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेह सडल्याने तो ओळखता येत नव्हता. मात्र, या माहेरहून पळालेल्या महिलेची चप्पले आणि रुमाल तिच्या घरच्यांनी ओळखल्याने पोलिसांनी देखील फार आढेवेढे न घेता मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला होता.
3 / 10
महिलेच्या कुटुंबाने तिच्या सासरच्या पती, सासू, सासरा, ननंदेवर तिला पळवून नेऊन हत्या केल्याचा एफआयआर दाखल केला होता. यामुळे पोलिसांना त्या दृष्टीने तपास करावा लागला. नंतर जे हाती आले ते पोलिसांसाठीही धक्कादायक होते.
4 / 10
पोलिसांना जरी तो मृतदेह सापडला असला तरीही ती हीच महिला होती याचे पुरावेसापडत नव्हते. तर दुसरीकडे चौकशीत ती महिला जिवंत असल्याचे पुरावे सापडू लागले होते. पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. ही महिला जिवंत आहे, तर मृतदेह सापडलेली महिला कोण होती? काहीच सुगावा लागत नव्हता.
5 / 10
पोलिसांनी आपला तपास पुढे सुरु ठेवला आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी या विवाहित महिलेला उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातून तिच्या प्रियकरासोबत पकडले.
6 / 10
चौकशी केल्यावर जो तिचा प्रियकर होता तो तिच्याच नात्यातील बहीणीचा नवरा असल्याचे समोर आहे. म्हणजे तो देखील विवाहित होता. महिलेने तिच्या या जिजूसोबत प्रेमसंबंध असल्याने पळून जाऊन लग्न केले होते. आता पुन्हा पोलिसांसमोर प्रश्न उभा ठाकला, मग ती महिला कोण होती, जिच्यावर अंत्यसंस्कार केले?
7 / 10
पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांना दोन वर्षांचा मुलगा होता. महिलेला तिचा आधीचा नवरा मारहाण करायचा म्हणून ती वैतागून माहेरी गेली होती. तिथे तिचे नात्यात लागणाऱ्य़ा जिजूसोबत प्रेमसंबंध फुलले आणि त्यांनी लग्न केले. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत आणि ते त्यांच्यासोबतच राहत आहेत.
8 / 10
दुसरीकडे या महिलेच्या आईने सांगितले की, कुदरा पोलिसांना एका नाल्य़ावर मृतदेह सापडला होता. त्या महिलेच्या पायात हिच्यासारखीच चप्पल आणि हातात रुमाल होता. त्यामुळे आमचीच मुलगी समजून आम्ही तिच्यावर अंत्यसंस्कार केले. आता पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडल्याने आम्हालाही धक्का बसला आहे.
9 / 10
इकडे पोलिसानी एक प्रकरण सोडवले असले तरी दुसऱ्या कोड्यात अडकले आहेत. 2018 मध्ये जी महिला गायब झालेली ती सापडली आहे. दुसऱ्या महिलेवर अंत्यसंस्कार झाले आहेत. याचे कोडे आता पोलिसांना सोडवायचे आहे.
10 / 10
मोहनियाचे डीएसपी रघुनाथ सिंह यांनी सांगितले की, या महिलेच्या सासरच्या पाच लोकांविरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला होता. ती महिला जिवंत सापडली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. आता पुढचे सोपस्कार पूर्ण केले जाणार असून विवाहित जिजूवर गुन्हा दाखल करण्यात य़ेणार आहे.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसBiharबिहारMurderखून