Faridabad : Daughter killed mother with help of boyfriend
धक्कादायक! व्हिडीओ कॉल करून प्रियकराने सांगितली पद्धत, मुलीने त्याचप्रमाणे केला आईचा खेळ खल्लास By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 1:45 PM1 / 9हरयाणाच्या फरीदाबादमध्ये पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमने एक ब्लाइंड मर्डर केस सॉल्व्ह केली आहे. क्राइम ब्रांचने दावा केला आहे की, १६ वर्षीय मुलीनेच तिच्या आईची हत्या केली. पोलिसांनी दावा केला की, प्रेम प्रकरणातून प्रियकरासोबत मिळून मुलीने हे कृत्य केलं.2 / 9पोलिसांनी सांगितलं की, अल्पवयीन मुलीला आपल्या प्रियकरासोबत लग्न करायचं होत. पण या लग्नाला तिच्या आईचा विरोध होता. यामुळे नाराज मुलीने प्रियकराच्या मदतीने आईची हत्या करण्याचा प्लॅन केला आणि तिची हत्या केली.3 / 9पोलिसांनुसार, मुलीने रात्री लिंबू पाण्यातून आईला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर प्रियकराने तिला व्हिडीओ कॉल करून हत्या कशी करायची हे सांगितलं.4 / 9१० जुलैच्या रात्री मुलीने हे धक्कादायक कृत्य केलं. यानंतर ११ जुलैला पोलीस या केसची चौकशी करत होते. काहीच सुगावा लागत नसल्याने ही केस क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आली. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली.5 / 9पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव दीपांशु असून त्याचं वय वय १८ आहे आणि तो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा आहे. तर अल्पवयीन मुलीचं वय १६ वर्षे आहे. ती फरीदाबादची आहे. 6 / 9फरीदाबादच्या उडिया कॉलनीत रहणाऱ्या विशालने ११ जुलैला पोलिसात तक्रार दिली होती की, रात्री कुणीतरी त्याची आई सुधाची हत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि केस क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आली.7 / 9क्राइम ब्रांचच्या टीमने अनुभवाच्या टेक्नॉलॉजीच्या आणि सूत्रांच्या माध्यमातून केसचा खुलासा केला. तसेच दीपांशुला ३ ऑगस्टला आणि अल्पवयीन मुलीला ४ ऑगस्टला अटक केली.8 / 9पोलिसांनुसार, तरूणाने सांगितल्याप्रमाणे मुलीने लिंबू पाण्यातून आईला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर रात्री साधारण १२ वाजता आरोपी दीपांशुला व्हिडीओ कॉल केला आणि ठरल्यानुसार दीपांशुने प्रेयसीला उशीने आईचं तोंड दाबण्यास सांगितलं. इतकंच नाही तर त्यानंतर ओढणीने गळा आवळण्यासही सांगितलं. 9 / 9दीपांशुने सांगितल्यानुसार, आधी उशीने तोंड आणि नंतर ओढणीने गळा आवळून मुलीने आईची हत्या केली. क्राइम ब्रांचने दोघांनाही अटक केली. दीपांशुला तुरूंगात पाठवण्यात आलं तर मुलीला करनाल येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं. आणखी वाचा Subscribe to Notifications