शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हॉटेल मॅनेजर अंघोळीसाठी गेली, गिझर चालू करताच बेशुद्ध पडली; क्षणात दोन जिवांचे आयुष्य संपले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:38 PM

1 / 11
फरीदाबादच्या एका हॉटेल मॅनेजरसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. रुचा नेहमीप्रमाणेच सायंकाळी कामावरून घरी आल्यावर अंघोळीला गेली होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही. यामुळे तिच्या घरच्यांना संशय आला म्हणून बाथरुमचा दरवाजा खटखटावला. आतून काहीच उत्तर येत नव्हते म्हणून शेजारच्यंना बोलवून बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला. आत पाहतात तर रुचा बेशुद्धावस्थेत पडली होती. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुचा तीन महिन्यांची गर्भवती होती. एक चूक तिच्या जिवावर बेतली.
2 / 11
पोलीस तपासात बाथरुममधील पाणी तापविण्याचा गिझर सुरु राहिल्याने रुचाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यांच्या घरी गॅस गिझर होता. गिझर चालू राहिल्याने गॅस लीक झाला आणि सगळा बाथरुम गॅसने भरून गेला. तिला श्वास घेण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने रुचाचा मृत्यू झाला.
3 / 11
अशीच घटना अनेकांसोबत होऊ शकते. अनेकदा इलेक्ट्रीक गॅस गिझरचा स्फोट झाल्यानेही बाथरुममध्ये असलेल्यांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. गॅस गिझरचे जरा वेगळे प्रकरण आहे.
4 / 11
तुम्ही गॅस गीझर लावला असेल तर गॅस सिलिंडर आणि गिझर दोन्ही बाथरूमच्या असावेत. आत असतील तर पुन्हा बदल करा. पाईपमधून बाथरूममध्ये पाणी आणता येते.
5 / 11
बाथरूमच्या आत गॅस गीझर लावला असेल, तर मोठी खिडकी किंवा हवा जाण्या येण्याची योग्य व्यवस्था असावी.
6 / 11
बाथरूमचा दरवाजा बंद करण्यापूर्वी बादली गरम पाण्याने भरून घ्यावी. गिझर बंद केल्यानंतरच आंघोळ करावी. बाथरूममध्ये क्रॉस वेंटिलेशन असल्याची खात्री करा.
7 / 11
अंघोळ करून कोणी बाहेर पडले तर लगेच स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये जाऊ नका. थोडा वेळ दरवाजा उघडा सोडा. एकामागून एक सतत अनेक लोकांच्या अंघोळीमुळे बाथरूममध्ये कार्बन मोनोऑक्साइड साठण्याची शक्यता वाढते.
8 / 11
ब्रँडेड कंपनीचे फक्त ISI मार्क असलेले छोटे-मोठे गिझर वापरावेत. यासाठी कमी जास्त पैशांचा विचार करू नये. कारण असे करणे रुचासारखे जिवावर बेतू शकते.
9 / 11
गॅसने भरलेला सिलिंडर खाली पाडून ठेवल्याने त्यातील गॅसचा दाब वाढतो, त्यामुळे त्याचा स्फोट होण्याची शक्यता असते. गॅस गिझरमध्ये एलपीजीचा वापर केला जातो. गिझर हानिकारक कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रस ऑक्साईड वायू तयार करतात. गिझर जास्त वेळ चालू ठेवल्याने आणि बंद बाथरूममध्ये राहिल्याने गुदमरल्यासारखे होते.
10 / 11
कार्बन मोनॉक्साईड शरीरात गेल्यावर व्यक्ती प्रथम बेशुद्ध होते. यानंतर मेंदू कोमासारख्या अवस्थेत जातो. कार्बन मोनोऑक्साइड शरीरात ऑक्सिजन पोहोचवणाऱ्या लाल पेशींवर हल्ला करतो. जेव्हा एखादा व्यक्ती श्वास घेतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिनशी मिसळतो. हिमोग्लोबिनच्या मदतीने ऑक्सिजन फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागांमध्ये जातो.
11 / 11
कार्बन मोनोऑक्साइड श्वासातून आत गेल्याने हिमोग्लोबिनचे रेणू ब्लॉक होतात आणि शरीराच्या ऑक्सिजन वहन प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, घबराट होणे, मळमळ होणे, विचार करण्याची क्षमता प्रभावित होणे, हात व डोळ्यांचे समन्वय बिघडणे, पोटदुखी व उलट्या होणे, ह्दयाचे ठोके वाढणे, शरीराचे तापमान कमी होणे, रक्त कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. हृदय आणि श्वसनक्रिया बंद होते.
टॅग्स :hotelहॉटेल