शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधी पत्नी अन् आता वहिनी...; का अडचणीत सापडला SDM ज्योती मोर्याचा पती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 1:49 PM

1 / 9
आधी पत्नी आणि आता वहिनी... एसडीएम ज्योती मौर्याचा पती आलोकच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे, तर एकीकडे आलोकने पत्नी ज्योतीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर तिकडे ज्योतीनेही त्याच्याविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल केला आणि आता वहिनीने आलोक मौर्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.
2 / 9
आलोकची वहिनी शुभ्रा मौर्याने लग्नानंतर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. पैशासाठी सासरची मंडळी मारहाण करत असत. याबाबत पोलिसांकडे अनेकदा तक्रार करूनही गुन्हा दाखल होत नव्हता. यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली होती, त्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
3 / 9
शुभ्रा मौर्य ही देवी नगर मीरा पट्टी प्रयागराज येथे राहणाऱ्या विनोद कुमार मौर्य यांची पत्नी आहे. शुभ्राचा आरोप आहे की, तिचा पती विनोद मौर्य यांनी लग्नाच्या वेळी ते इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अधिकारी आहेत असं सांगितले होते मात्र ते जीएसटी विभागात स्टेनोग्राफर म्हणून प्रयागराजमध्ये कार्यरत असल्याचे आढळले.
4 / 9
माझ्याशी अशा प्रकारे खोटे बोलून लग्न करण्यात आले. लग्नाच्या वेळी ५ लाख रुपये रोख आणि ५ लाखांचे दागिने, कार आणि इतर हुंड्याचे साहित्यही दिले होते. यानंतरही तिचा हुंड्यासाठी छळ करून तिला मारहाण करण्यात आली असा आरोप शुभ्राने केला.
5 / 9
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप करत शुभ्राने सासरा राम मुरारी मौर्य, सासू लीलावती मौर्य, दीर अशोक कुमार मौर्य, नंणद प्रियंका मौर्य, छोटा दीर आलोक मौर्य यांच्या विरोधात अनेकदा तक्रारी केल्या, पण कोणतीही कारवाई झाली नाही. पती विनोद मौर्य वारंवार मोठी गाडी आणि हिऱ्याची अंगठी, सोन्याचे दागिने मिळवण्यासाठी दबाव टाकू लागला. ते रोज माझा छळ करू लागले असं तिने म्हटलं.
6 / 9
शुभ्राने सांगितले की, मी २०१५ मध्ये सहाय्यक शिक्षकाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्या सेवेत रुजू झाले, त्यानंतर त्यांच्या सासरच्या घरातील वातावरण चांगले झाले, पण ते काही काळ राहिले. यानंतर पुन्हा सासरच्या लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. छळ होऊ लागला.
7 / 9
मुलगी आहे म्हणून सासरचे लोक तिला टोमणे मारायचे. जेव्हा तिला मुलगी झाली तेव्हा सासू आणि सासरे तिला टोमणे मारायला लागले. त्याच्या मुलीलाही मारण्याचा प्रयत्न झाला, ज्याच्या खुणा मुलीच्या डोक्यावर अजूनही आहेत. सासरच्यांना मुलगा हवा होता. मुलगी झाली तेव्हा रोज मारामारी, भांडण व्हायचे असा शुभ्राचा आरोप आहे
8 / 9
काही दिवसांपूर्वी आलोक मौर्य याने पत्नी ज्योती मौर्य हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. ज्योती एसडीएम होताच त्याला सोडून गेल्याचा आलोकचा आरोप आहे. महोबाचे होमगार्ड कमांडंट मनीष दुबे यांच्यासोबतही तिचे अफेअर होते. आणि आता मनीष आणि ज्योती दोघांना मिळून मला मारायचं ठरवलंय असा आरोप आलोकने केला.
9 / 9
हे प्रकरण जोर धरू लागल्यावर ज्योतीने पती आलोक आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. हुंड्यासाठी तिचा छळ करत असल्याचा आरोप केला. हे प्रकरण अद्याप न्यायालयात सुरू आहे, दरम्यान आलोकची वहिनी शुभ्रा हिनेही छळाचा आरोप करत सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये आलोकच्या नावाचाही समावेश आहे. त्यामुळे आलोकच्या अडचणीत वाढ झाली आहे.