शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना रिलीफ फंडातून कोट्यवधी लुबाडले; सर्वात महागडी कार अन् लग्झरी वस्तूंची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 4:54 PM

1 / 10
सध्या संपूर्ण जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे, कोट्यवधी लोक कोरोनाचा शिकार झाले आहेत तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.
2 / 10
कोरोना महामारी अनेक व्यवसायांवर गदा आली, तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मोठ्या संख्येने लोक जगण्यासाठी संघर्ष करु लागले.
3 / 10
मात्र या स्थितीतही लोकांना लुबाडण्याचे धंदे कमी झाले नाहीत, अमेरिकेतील एका व्यक्तीने कोरोना रिलीफ फंडद्वारे २९ कोटी रुपये लोकांकडून जमा केले आणि अय्याशी करु लागला.
4 / 10
शुक्रवारी या युवकाला पोलिसांनी अटक केली, मंगळवारी या आरोपीला कोर्टाने जामीनही मंजूर केला. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार हा युवक अमेरिकेतील फ्लोरिडा येथील राहणारा आहे.
5 / 10
डेविड हिन्स या युवकावर बँकेची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कोरोना रिलीफ फंडाच्या पैशातून त्याने लैंबॉर्गिनी कार आणि अन्य लग्झरी सामान खरेदी केले आणि महागड्या हॉटेलमध्ये राहू लागला.
6 / 10
२९ वर्षाच्या युवकानं बँकेची फसवणूक केली, अनेक संस्थांना चुकीची विधान करुन फसवलं जेणेकरुन रिलीफ फंडासाठी पैसे गोळा करता येईल असा आरोप स्थानिक अधिकाऱ्यांनी केला आहे.
7 / 10
सुरुवातीला युवकाने विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सॅलेरी देण्याच्या नावाखाली सरकारकडून १३५ लाख डॉलर मिळवण्याचा प्रयत्न केला. पण तपासात हा युवक बनावट असल्याचं निष्पन्न झालं.
8 / 10
तपासात अनेक कर्मचारी बनावट होते तर अनेकांची सॅलरी युवकाने सांगितलेल्या रक्कमेपेक्षा खूपच कमी होती. बँकेने त्याला पहिल्यांदा ३९ लाख डॉलर कर्ज देण्याची मान्यता दिली.
9 / 10
स्पोर्टस कारच्या एका अपघाताने अधिकाऱ्यांनी या युवकाविरोधात चौकशी सुरु केली. त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले.
10 / 10
सरकारच्या रिलीफ कार्यक्रमातंर्गत कर्ज मिळाल्यानंतर युवकाने २.३ कोटींची २०२० मॉडेल लैबॉर्गिनी कार खरेदी केली. त्यासोबत लाखो रुपये डेटिंग वेबसाईट, ज्वेलरी, कपडे आणि महागड्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी खर्च केल्याचं समोर आले.
टॅग्स :fraudधोकेबाजीcorona virusकोरोना वायरस बातम्याbankबँक