Four grooms were waiting for the same bride to marry; knew fraud happened, they went to police
गुडघ्याला बाशिंग...! एकाच नवरीची चार नवरदेव वाट पाहत होते, सर्व एकत्र पोहोचताच... By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 12:26 PM1 / 10भोपाळच्या कोलारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एक नवरदेव लग्नासाठी आला परंतू त्याला नववधूच सापडली नाही. यामुळे तो पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला. तिथे जाताच त्याला त्याच्यासारखेच आणखी तीन नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले दिसले. 2 / 10पोलिसांनी या प्रकाराची चौकशी सुरु केली आहे. हरदाला राहणारा एक तरुण गुरुवारी लग्नासाठी भोपाळच्या कोलारमध्ये गेला होता. जन कल्याण समितीच्या कार्यालयात त्याचे लग्न होणार होते. तिथे टाळे लागलेले होते. 3 / 10दरवाजाला टाळे पाहून नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबाने मुलीची चौकशी केली. तेव्हा त्यांना या नावाचे कोणी राहत नसल्याचे सांगितले गेले आणि पायाखालची वाळूच सरकली. 4 / 10यानंतर त्यांनी मुलीच्या नातेवाईकाच्या मोबाईल नंबरवर फोन केला तर तो फोन बंद आला. यामुळे काहीतरी गडबड असल्याचा संशय नातेवाईकांना आला. 5 / 10फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कोलारच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे आधीपासूनच आणखी तीन नवरदेव लग्नाच्या पूर्ण तयारीत आल्याचे दिसले. या साऱ्यांचे चेहरे उतरलेले होते. 6 / 10याच नवरीसोबत आणखी तीन नवरदेव लग्न करण्यासाठी आले होते. यानंतर चारही नवरदेवांना लग्नाच्या नावाखाली फसविल्याचे समोर आले. 7 / 10सीएसपी भूपेंद्र सिंह यांनी या प्रकरणी सांगितले की, नवरदेवांच्या आरोपांवरून चौकशी सुरु केली असता या टोळीमध्ये तीन जण असल्याचे समोर आले आहे. फोन नंबरच्या आधारे त्यांचा पत्ता शोधला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला आणि दोन पुरुष आहेत.8 / 10हे लोक ज्या जिल्ह्यांमध्ये लग्नासाठी मुलींची संख्या कमी आहे, किंवा लग्न करण्यात अडचणी आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रचार करायचे. या प्रचारावेळी ते लोकांना आपला मोबाईल नंबर द्यायचे. नवरी मिळत नसल्याने किंवा लग्न जुळत नसल्याने लोक त्यांना फोन करायचे. त्यांना भोपाळला बोलविले जायचे. 9 / 10भोपाळमध्ये काही तरुणींना हे टोळके 200 ते 500 रुपयांमध्ये घेऊन यायचे. लेबर चौकात कामाच्या शोधात या तरुणी असायच्या. मुलाकडच्यांना त्या मुली दाखविल्या जायच्या. जेव्हा त्यांना मुलगी पसंत पडायची तेव्हा ते मुलाकडच्यांकडून 20000 रुपये घ्यायचे आणि लग्न ठरल्याचे सांगायचे. 10 / 10सध्या या तिकडीला पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच या लोकांचे जुने गुन्हेदेखील तपासले जात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications