शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 12:20 PM

1 / 10
भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. लग्नानंतर या नववधू नवऱ्याचे घर लुटून पसार होत होत्या. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात 'हाहाकार' उडाला होता.
2 / 10
गुन्हे शाखेला याची तक्रार मिळाली होती. लग्नानंतर काही दिवसांतच नववधू गायब झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क होत नाहीय. भोपळमध्ये अशा 4 तक्रारी आल्या होत्या. पोलिसांनी तपास सुरु करून शुक्रवारी सायंकाळी 8 जणांना ताब्यात घेतले.
3 / 10
शनिवारी चौकशीत मोठा खुलासा झाला. यामध्ये तीन महिला ज्या नवरी बनत होत्या. त्यांची चौकशी केली असता त्यांनी 4 महिन्यांत 9 लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तसेच या लग्नानंतर 10 दिवसांच्यावर एकही दिवस थांबत नव्हत्या.
4 / 10
लॉकडाऊनकाळात लग्नाच्या नावाखाली ही टोळी लोकांना लुटायचे काम करत होती. कालापीपल भागात राहणाऱ्या प्रसाद नावाच्या व्यक्तीने पहिली तक्रार दाखल केली होती. प्रसाद लग्नासाठी स्थळ शोधत होता. यावेळी त्याला एका ओळखीच्या व्यक्तीने दिनेश पांडे नावाच्या व्यक्तीशी ओळख करून दिली. दिनेशने प्रसादला रिया उर्फ पूजा नावाच्या तरुणीशी भेटवले. त्यांच्या लग्नासाठी 85 हजार रुपये घेतले. यानंतर प्रसाद आणि रिय़ाचे लग्न सीहोरमध्ये झाले.
5 / 10
लग्नाच्या 8-10 दिवसांनंतर दिनेशने प्रसादला फोन केला. त्याने सांगितले की, रियाच्या बहीणीचे ऑपरेशन आहे तिला माहेरी पाठव. प्रसादने रियाला काही पैसे देऊन माहेरी पाठविले. मात्र, ती परत आलीच नाही. प्रसादने दिनेशला फोन केला, तेव्हा दिनेशने त्याला सांगितले की, ती पुन्हा येणार नाही. तिने दुसरे लग्न केले आहे.
6 / 10
या टोळीमध्ये असलेल्या तीन महिला या आलटून पालटून नववधू बनत होत्या. नवऱ्यासोबत त्याच्या घरी नांदायला जात होत्या. काही दिवस राहून त्या तेथून पोबारा करत होत्या. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद लागत होता. काही जण लाजेखातर पोलिसांत येत नव्हते.
7 / 10
पोलिसांनी सांगितले की, आधीच 4 लोकांनी तक्रार दिली आहे. आणखी 5 केस दाखल होणार आहेत. या तिघींच्या चौकशीमध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
8 / 10
पूजा उर्फ टीना धाकडने ९ पैकी 4 लग्ने केली आहेत. रिया हे देखील याच महिलेचे नाव आहे. सोहागपूरच्या जगदीश मीना यांच्यासोबत तिचे 22 मे रोजी लग्न झाले होते. टीनाला पोलिसांच्या ताब्यात पाहून जगदीशने पोलिसांना विरोध केला. तू चिंता करू नको, मी तुला जामिनावर सोडवतो, असे सांगितले. यावर पोलिसांनी त्याला तिथे उपस्थित असलेले तीन जण देखील तिचे पतीच आहेत, असे सांगितल्यावर जगदीश ताळ्यावर आला.
9 / 10
खरी बाब समजल्यानंतर आधी पोलिसांना विरोध करणारा जगदीश मीना रियाच्या विरोधात गुन्हा नोंदवायला तयार झाला. लग्न पार पडल्यानंतर त्यांचा मुखिया जो सुरक्षा रक्षक होता, परंतू लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती, तो या महिलांना 30000 रुपये देत होता. यानंतर या महिला नवऱ्य़ाच्या घरातील दाग-दागिने घेऊन पसार होत होत्या.
10 / 10
पोलिसांनी य़ा टोळीचा मुखिया दिनेश पांडे, तेजुलाल, वीरेंद्र सिंह धाकड़, सलमान खान, विक्रम, पूजा उर्फ रिया, सीमा पाटीदार, रीना उर्फ सुल्ताना यांना ताब्यात घेतले आहे.
टॅग्स :Policeपोलिसmarriageलग्न