Frolov, 42, scammed around 300 women over a period of 10 years by using fake names and documents
"एकटेपणाला कंटाळलोय.."; युवकानं ३०० महिलांना अक्षरश: रस्त्यावर आणलं, काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 10:31 AM1 / 10इंटरनेटवरून एक दोन नव्हे तर तब्बल ३०० महिला, युवतींना फसवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीनं कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्गचे हे प्रकरण आहे. 2 / 10पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४२ वर्षीय दमित्री फ्रोलोव याला ताब्यात घेतलेय. गेल्या १० वर्षाहून अधिक काळ आरोपी रशियात बनावट कागदपत्रे आणि नावासह प्रवास करत होता. शेकडो महिलांची फसवणूक करून तो आलिशान जीवन जगत होता. 3 / 10फक्त श्रीमंत महिलांनाच नाही तर गरीब महिलांनाही आरोपीने जाळ्यात ओढले. फ्रोलोव श्रीमंत महिलांना फसवणूक पैसे घ्यायचा तर गरिब महिलांना कर्ज घ्यायला सांगून त्यातील पैसे घेऊन फरार व्हायचा. स्थानिक माध्यमानुसार, फ्रोलोव डेटींग एप्सद्वारे महिलांना टार्गेट करत होता. 4 / 10याठिकाणी तो एकटेपणाला कंटाळलोय, कुणाची तरी साथ हवी असं त्याने त्याच्या बायोमध्ये लिहिलं होते. छोटा व्यवसाय असल्याची बतावणी फ्रोलोव महिलांना करायचा. मेट्रो यूके रिपोर्टनुसार, ३५ वर्षीय पीडित महिलेला फ्रोलोवनं फसवले. 5 / 10या महिलेचे घर, कार सर्वकाही विकायला लावले. त्यानंतर महिलेला ५ लाख कर्ज घेण्यास भाग पाडले आणि ते पैसेही घेऊन फ्रोलोव पसार झाला. पीडित महिला म्हणाली की, फ्रोलोवला खूप आत्मविश्वास आहे. महिलांना काय हवे, त्यांची गरज काय हे त्याला समजायचे. 6 / 10महिलांचा कमकुवतपणा शोधून त्यांना टार्गेट करतो. तो खूप भोळा असल्याचं दाखवतो. तो वेगवेगळी स्वप्ने दाखवत होता त्याला बोलण्याला भुलून मी घर, कार सर्वकाही विकले आणि आज रस्त्यावर आली आहे असा आरोप तिने केला. 7 / 10तसेच फ्रेलोवने २ वर्ष माझ्याशी नाते ठेवले. दोघांनी मिळून एकत्र व्यवसाय करण्याचे त्याने माझ्या डोक्यात भरवले. जर एखाद्या महिलेला संशय आला तर तो तिचं कौतुक करून, भेटवस्टू देत तिचे मन जिंकायचा. त्याने मला त्याच्या पैशावर सुट्टीसाठी पाठवले होते. 8 / 10तो चांगला माणूस आहे असं मला वाटायचं परंतु माझी कार विकून जे पैसे मिळाले त्याच ४ लाखातून त्याने माझ्यावर खर्च केला असं आणखी एका पीडितेने सांगितले. ज्या महिलेकडे पैसे नाहीत अशा महिलांनाही तो शिकार बनवायचा. गरिब महिलांच्या नावाने कर्ज काढायचा आणि पैसे मिळताच पळून जायचा. 9 / 10या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून फ्रोलोव हा अलेक्सान्ट्रोव नावाच्या छोट्या शहरात राहायला असल्याचे समोर आले. याआधीही तो फसवणुकीच्या प्रकरणात जेलमध्ये गेला आहे. तो त्याचे नाव, कार आणि कागदपत्रे सातत्याने बदलत असतो. 10 / 10आतापर्यंत त्याने ३०० महिलांना अशाप्रकारेच फसवल्याचं उघड झाले आहे. या प्रकरणात फ्रेलोव दोषी आढळला तर त्याला ६ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते असं पोलीस म्हणाले. पोलीस या प्रकरणात आरोपीविरोधात आणखी पुरावे शोधत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications