Gang rape of a ninth standard student; After getting pregnant, Family get shocked
नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; गरोदर राहिल्यानंतर कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 3:40 PM1 / 11पीडित मुलगी गरोदर राहिल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर घटनेची माहिती कुटुंबातील सदस्यांना देण्यात आली आहे. 2 / 11नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे. आरोपींचे वय १४-१५ दरम्यान आहे.3 / 11तपासादरम्यान, हे उघडकीस आले की, आरोपी विद्यार्थ्यांपैकी एकाने पीडितेला तरूणाशी बोलत असल्याचे पाहिले. यानंतर त्याने या भागाला बदनाम करण्याची धमकी देऊन बलात्कारासाठी ब्लॅकमेल करणे सुरू केले.4 / 11पोलिसांनी सांगितले की, ती मुलगी नववीची विद्यार्थिनी आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये ही मुलगी घराच्या शेजारी बांधकाम ठिकाणी काम करणाऱ्या मजूरशी बोलायची. या दरम्यान तिच्या १४ वर्षाच्या शेजारच्या विद्यार्थ्याने दोघांनाही एकत्र पाहिले. तेव्हापासून त्याने त्याला बदनाम करण्याची धमकी दिली.5 / 11तपास अधिकारी संजीव धाकड म्हणाले की, बदनाम न करण्याच्या बदल्यात विद्यार्थ्यांनी तिला संबंध ठेवण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली.6 / 11 धकड यांनी सांगितले की ,आरोपी विद्यार्थी तिला तिच्या आजीच्या घरी घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. तीन-चार दिवसांनी तो एका मित्राला घेऊन आला आणि दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. ऑक्टोबर महिन्यापासून ब्लॅकमेलिंग चालूच होती.7 / 11आरोपींच्या भीतीने पीडितेने कुटुंबातील सदस्यांना घटनेची कोणतीही माहिती दिली नाही. नोव्हेंबर २०२० मध्ये, पहिल्या दोन मुलांनी मुलीला जबरदस्तीने मित्राच्या घरी नेले, जिथे एक २१ वर्षीय तरुण देखील थांबला होता. चौघांनी पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. घटनेदरम्यान एक मुलगा पाळत ठेऊन होता की कोणी येत ना8 / 11यानंतरही चौघांनी पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा मुलगी गरोदर राहिली. आरोपींनी पीडितेला कोणाला याबाबत सांगितले तर बलात्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतील अशी धमकी दिली. 9 / 11यामुळे तिने आपल्या कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती दिली नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या पालकांनी मुलीच्या शरीरात बदल जाणवले. त्यानंतर त्याला डॉक्टरकडे नेले. मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी घरातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले.10 / 11 शुक्रवारी कुटुंबियांनी रतीबड़ पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.11 / 11एसआय संजीव धाकड यांनी सांगितले की, अल्पवयीन आरोपींना जुवेनाईल होममध्ये पाठविण्यात आले आहे. त्याचवेळी २१ वर्षीय आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे. पीडितेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications