Ghaziabad woman kill ex boyfriend who was stalking and threatening her
खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या.. By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 2:51 PM1 / 11उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून (Ghaziabad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या २६ वर्षीय एक्स-बॉयफ्रेन्डला(Ex Boyfriend) पार्टीसाठी घरी बोलवलं. मग होणाऱ्या पतीसोबत मिळून कथितपणे त्याची हत्या (Murder) केली. 2 / 11पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर तरूणी आणि तिचा होणारा पती दोघेही फरार आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.3 / 11ही घटना गाजियाबादच्या वैशाली सेक्टर-४ मध्ये घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव नितिन चौधरी(२६) असून तो बी.कॉमचा विद्यार्थी होता. 4 / 11पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येण्याची तक्रार केली होती. ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला.5 / 11घटनेपासून तरूणी तिच्या होणाऱ्या पतीसोबत फरार झाली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीकडे फ्लॅटच्या मालकाने घर भाड्याने देण्यासाठी चावी दिली होती. 6 / 11फ्लॅटच्या मालकाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने त्याच्या मित्राकडे फ्लॅटची चावी दिली होती. जेणेकरून फ्लॅट भाड्याने देता येईल.7 / 11पोलिसांनी सांगितले की, नितिन चौधरी आणि तरूणीचं जवळपास चार वर्षे रिलेशन होतं. पण दोन महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. यादरम्यान तरूणीचं लग्न सनी नावाच्या तरूणासोबत ठरलं. दोघांचा साखरपुडाही झाला.8 / 11पण नितीन ब्रेकअप मान्य करू शकत नव्हता. तो तरूणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि तिला त्रास देत होता.9 / 11पोलिसांनुसार, नितीन सतत तरूणीला त्रास देत होता. अशात तिने होणाऱ्या पतीसोबत एक्स-बॉयफ्रेन्डचा काटा काढण्याचा प्लॅन केला. 10 / 11तरूणीने खोटं कारण सांगत देत नितीनला पार्टीसाठी घरी बोलवलं. तिथे तिचा होणारा पती सनीही उपस्थित होता. पार्टीत तिघांनीही दारू प्यायली. 11 / 11नंतर तरूणीने होणाऱ्या पतीसोबत मिळून एक्स बॉयफ्रेन्ड नितीनची हत्या केली. त्यानंतर दोघेही तेथून फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications