शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संशयाचं भूत महाभयंकर; रागाच्या भरात तिने प्रियकराचं गुप्तांग कापून फ्लश केलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 9:30 PM

1 / 10
हुवांग नावाच्या व्यक्तीचे वय ५२ आहे आणि त्याला तीन मुले आहेत. हुवांग झोपलेला असताना त्याच्या प्रेयसीने त्याच्यासोबत धक्कादायक घटना घडवून आणली.
2 / 10
हुवांग आणि त्याची गर्लफ्रेंड फुंगने यापूर्वी आपल्या पार्टनरसह घटस्फोट घेतला होता. ४० वर्षांची ही महिला गेल्या १० महिन्यांपासून हुवांगबरोबर राहत आहे आणि तिला पहिल्या लग्नामुळे तैवानचे नागरिकत्व मिळाले आहे.
3 / 10
या दाम्पत्याच्या शेजार्‍यांनी सांगितले की, या वादाबद्दल बरेचदा त्यांच्याकडे आवाज ऐकू येत असायचा. हुवांग एक ताओ मंदिर चालवतात आणि तेथील काही महिलांशी त्यांची मैत्री आहे. यापैकी काही महिला  खूप जवळच्या आहेत. यामुळे त्यांची गर्लफ्रेंड खूप अस्वस्थ असायचीआणि त्यांच्यात भांडणही होत असे.
4 / 10
५२ वर्षीय हुवांग तैवानमध्ये राहतो. तो चिकन नूडल्स खाऊन आणि मद्यपान करून झोपी गेला होता. अचानक जाग आली तेव्हा त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या.
5 / 10
त्याचा गुप्तांगाचा काही भाग गायब झाला होता. स्थानिक माध्यमांनी संवाद साधताना एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही व्यक्ती भयानक अपघात होऊनही चालण्यास सक्षम होती.
6 / 10
हुवांगला जास्त रक्तस्त्राव झाला होता आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विषयावर बोलताना डॉक्टरांनी सांगितले की, या व्यक्तीच्या खासगी भागाचा दीड सेंटीमीटर भाग कापला गेला आहे. तथापि, या व्यतिरिक्त, त्याच्या शरीराचे इतर अवयव सुरक्षित आहेत.
7 / 10
हुवांगच्या गर्लफ्रेंडने त्याचं गुप्तांग स्वयंपाकघरातील कात्रीने कापला होता. यानंतर तिने मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. फुंगने असेही म्हटले आहे की, त्याने आपल्या प्रियकराच्या खासगी भाग कापून कमोटमध्ये फ्लश केला जेणेकरून तो खाजगी भाग पुन्हा कधी जोडला जाऊ शकणार नाही.
8 / 10
या प्रकरणात, रुग्णालयाचे उपसंचालक म्हणाले - हुवांगला सतत रक्तस्त्राव होत होता, म्हणूनच त्याला थांबवण्यासाठी आपत्कालीन शस्त्रक्रिया करावी लागली. ते खात-पित आहेत. पण त्यांना अजूनही वेदना होत आहेत. खाजगी भाग कापल्यानंतर यापुढे त्यांना शारीरिक संबंध ठेवणं शक्य होणार नाही.
9 / 10
डॉक्टर पुढे म्हणाले की, त्याच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे कृत्रिम खाजगी भाग. या व्यतिरिक्त पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया आणि मानसोपचार समुपदेशनाची देखील आवश्यकता असेल. पुढील काही महिने हुवांगसाठी आव्हानात्मक असणार आहेत.
10 / 10
या प्रकरणात हुवांगच्या गर्लफ्रेंडने त्याच्या जेवणात झोपेची औषधी किंवा ड्रग्स टाकले होते की नाही याची चौकशीही पोलिस करीत आहेत. हुवांगचे यापूर्वी तीन वेळा लग्न झाले आहे आणि त्यांना या तीन विवाहांमधून तीन मुले आहेत.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस