girl murdered for inter caste love marriage in mainpuri, uttar pradesh
'ऑनर किलिंग'... आंतरजातीय विवाह केला म्हणून भावांकडून बहिणीची हत्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 8:21 PM1 / 7मैनपुरी: आंतरजातीय विवाह करणाऱ्या एका तरुणीची तिच्या भावांनीच हत्या केल्याचे धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये घडली आहे.2 / 7या तरुणीने आपल्या आंतरजातीय तरुणासोबत प्रेमविवाह केला होता. कुटुंबीयांकडून होणारा विरोध पाहता या दोघांनी एका मंदिरात विवाह केला होता. 3 / 7या विवाहानंतर मनात राग असलेल्या तरुणीच्या भावाने तिला विश्वासात घेऊन दिल्लीहून मैनपुरी या गावी बोलावून घेतले. गावी आल्यानंतर याठिकाणी भावाने आपल्या इतर दोन भावांसोबत मिळून या बहिणीची हत्या केली.4 / 7विशेष म्हणजे, बहिणीची हत्या केल्याचे उघड होऊ नये, यासाठी या तिघा भावांनी मिळून आपल्या बहिणीचा मृतदेह जमिनीत पुरून नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.5 / 7माहेरी गेलेली पत्नी परतली नाही. त्यामुळे तरुणीच्या पतीने दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तरुणीच्या भावांची चौकशी केली.6 / 7पोलिसांनी केलेल्या या चौकशीत तरुणीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपींनी गुन्हा मान्य केल्यानंतर दिल्ली पोलीस मैनपुरीला दाखल झाले.7 / 7दिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेतात जाऊन जेसीबीच्या साहाय्याने जमीन खोदून तरुणीचा विघटन झालेला मृतदेह ताब्यात घेतला. आणखी वाचा Subscribe to Notifications