शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चुलत भावासोबत होते तरुणीचे संबंध, वडिलांनी आक्षेपा्र्ह अवस्थेत पाहिले आणि....

By बाळकृष्ण परब | Updated: March 4, 2021 08:46 IST

1 / 6
गेल्या काही काळापासून अनैतिक संबंधांचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा संबंधांसमोर अनेकांना नात्यांचाही विसर पडू लागला आहे. त्यातून अनेक गुन्हेही घडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2 / 6
उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात वडिलांनी आपल्या मुलीचे डोके धडावेगळे केले. एवढेच नाही तर सदर व्यक्ती आपल्या मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार कॉलेजमध्ये जाणाऱ्या या १८ वर्षीय तरुणीचे कुटुंबातीलच चुलत भावाशी अनैतिक संबंध होते. वडिलांनी या तरुणीला दोन दिवसांपूर्वीच सदर तरुणासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी ही तरुणी घटनास्थळावरून पसार झाली होती. मात्र तेव्हापासून तिचे वडील खूप संतप्त झाले होते. त्यांनी आपल्या मुलीची आणि प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली होती. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांनी मुलीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचे डोके धडावेगळे केले.
4 / 6
त्यानंतर आरोपी वडील मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. वाटेत हे दृश्य पाहून लोकांची भीतीने गाळण उडाली. दरम्यान कुणीतरी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानंतर पोलिसांनी या वडिलांना ताब्यात घेतले.
5 / 6
याबाबत हरदोईचे एसपी अनुराग वत्स यांनी सांगितले की, मुलीचे वडील तिच्या प्रेमसंबंधांमुळे नाराज होते. त्यांनी त्यांची मुलगी आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली होती. दरम्यान, घरात मुलीला एकटी पाहिल्यानंतर सदर व्यक्तीने दरवाजा बंद केला आणि मुलीचे डोके धडापासून वेगळे करत तिची हत्या केली. त्यानंतर हे डोके घेऊन तो पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाला.
6 / 6
या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपील अटक करत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तसेच आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील, असेही पोलिसा्ंनी सांगितले.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश