Gold heist at Canada's biggest airport is probed by police
१२१ कोटी रुपयांचा सोन्याने भरलेला अख्खा कंटेनर लंपास; सुरक्षा यंत्रणेत खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 8:49 PM1 / 8२०१२ मध्ये अभिषेक बच्चनचा 'प्लेयर्स' हा चित्रपट आला होता. या चित्रपटात, कुशल बुद्धी आणि अचूक योजना असलेल्या चोरांच्या एका टोळीने प्रचंड सुरक्षेत चालत्या ट्रेनमधून कोट्यवधी रुपयांचे सोने लंपास करून पळून गेले. बरं, ही एका चित्रपटाची गोष्ट आहे, पण कॅनडामध्ये असंच काहीसं घडलं आहे. 2 / 8कॅनडात चोरट्यांच्या टोळीने चतुराईने सोन्याने भरलेला अख्खा कंटेनर चोरून नेला. या कंटेनरमध्ये एक-दोन कोटींचे नव्हे तर तब्बल १२१ कोटींचे सोने होते. आता या चोरीने सगळेच हैराण झाले आहे. इतक्या सुरक्षेततही चोरी कशी झाली? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 3 / 8ही घटना तीन दिवसांपूर्वीची आहे. या घटनेनंतर पोलिसांची झोप उडाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, १७ एप्रिलच्या रात्री एक कंटेनर टोरंटोच्या पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. या कंटेनरमध्ये १२१ कोटींच्या सोन्याबरोबरच खूप मौल्यवान वस्तूही होत्या. 4 / 8हा कंटेनर नंतर विमानतळाच्या कंटेनर सुविधेमध्ये (जिथे सर्व कंटेनर ठेवले जातात) हलवण्यात आले. २० एप्रिल रोजी संपूर्ण कंटेनर चोरीला गेल्याचं आढळून आले. जेव्हा ही गोष्ट उघडकीस आली तेव्हा सुरक्षा यंत्रणेचे ढाबे दणाणले. 5 / 8मोठी गोष्ट म्हणजे कंटेनर चोरीला जाऊन तीन दिवस उलटले, पण पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. कंटेनर विमानातून उतरवण्यात आला होता असं स्थानिक पोलिस निरीक्षक स्टीफन ड्यूव्हेस्टन यांनी 'टोरंटो स्टार' वृत्तपत्राला सांगितले 6 / 8कंटेनरची चोरी अत्यंत दुर्मिळ असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा कंटेनर कसा चोरीला गेला याचा सर्व अँगलने तपास करत आहोत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. लवकरच काही सुगावा हाती लागेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. 7 / 8टोरंटो स्टार या वृत्तपत्राने चोरी केलेल्या सोन्याचे वजन ३६०० पौंड असल्याचे वृत्त दिले आहे. या घटनेनंतर टोरंटो विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, चोरट्यांनी तिसऱ्या व्यक्तीकडून गोदाम भाड्याने घेतल्याचे समजते. अशा गोदामांची सुरक्षा आमच्या प्राधान्याच्या बाहेर आहे.8 / 8या चोरीत परदेशी टोळीचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. हा कंटेनर कोणत्या कंपनीचा होता आणि कोणत्या विमानाने तो कॅनडाला आला हे सध्या तरी कळू शकलेले नाही. पण १२१ कोटींच्या सोने चोरीने अनेकांची झोप उडवली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications