शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१४ देश...२८ गँगस्टर्स! भारतानं तयार केली वॉण्टेड गुन्हेगारांची लीस्ट; कसं पकडून आणणार वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 2:09 PM

1 / 10
केंद्र सरकारनं वॉण्टेड गँगस्टर्सची एक यादी तयार केली आहे. या यादीत एकूण २८ गँगस्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. जे भारत सोडून इतर देशांमध्ये लपून बसले आहेत.
2 / 10
न्यूज एजन्सीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या २८ जणांमध्ये नऊ कॅनडा आणि पाच गँगस्टर्स अमेरिकेत बसले आहेत. हे असे गँगस्टर्स आहेत ज्यांच्यावर खून, खंडणी आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या यादीत सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी ब्रार याचंही नाव आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा मास्टरमाइंड गोल्डी ब्रार असल्याचं सांगितलं जात आहे. गोल्डी हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. गेल्या वर्षी २९ मे रोजी सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली होती.
3 / 10
अनमोल बिश्नोई उर्फ भानू हे देखील एक मोठं नाव यादीत आहे. जो अमेरिकेत लपून बसला असण्याची शक्यता आहे. भानू याच्यावर दहशतवादी हल्ल्यांचं प्लानिंग केल्याचा आरोप आहे. त्यासोबतच मनोरंजन आणि कॉर्पोरेट जगताशी निगडीत लोकांना लक्ष्य केल्याचाही आरोप आहे.
4 / 10
कॅनडामध्ये सुखदुल सिंह उर्फ सूखा दुनेके, गोपिंदर सिंह उर्फ बाबा डल्ला, सतवीर सिंह वारिंग उर्फ सैम, स्नोवर ढिल्लन, लखबीर सिर्फ उर्फ लांडा, अर्शदीप सिंह अर्श डाला, चरणजीत सिंह उर्फ रिंकू बिहला, रमनदपीप सिंह उर्फ रमन जज आणि गगनदीप सिंह उर्फ गगना हाथुर. अमेरिकेत सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी ब्रार, अनमोल बिश्नोई, हरजोत सिंह गिल, दरमनजीत सिंह उर्फ दरमनजीत खालों आणि अमृत बाल.
5 / 10
यूएईमध्ये विक्रमजीत सिंह ब्रार उर्फ विक्की आणि कुलदीप सिंह उर्फ नवनशहरिया लपून बसले असल्याची शक्यता आहे. तर रोहित गोडारा युरोपमध्ये, तर गौरव पटयाल उर्फ लकी पटयाल अर्मेनियामध्ये आहेत. सचिन थपन उर्फ सचिन बिश्नोई अजरबैजान येथे, जगजीत सिंह गांधी आणि जैकपाल सिंह उर्फ लाली धालीवाल मलेशियामध्ये लपून बसले आहेत.
6 / 10
लिस्टनुसार हरविंदर सिंह उर्फ रिंडा पाकिस्तानात, राजेश कुमार उर्फ सोनू खत्री ब्राझीलमध्ये, संदीप ग्रेवाल उर्फ बिल्ला इंडोनेशियामध्ये, तर मनप्रीत सिंह फिलिपिन्समध्ये आहे. गुरजंत सिंह उर्फ जनता हा गुंड ऑस्ट्रेलियामध्ये लपून बसला आहे. तर रमनजीत सिंगह उर्फ रोमी हाँगकाँगमध्ये असल्याची शक्यता आहे.
7 / 10
भारताचा ४८ देशांसोबत प्रत्यार्पणाचा करार झालेला आहे. यामध्ये दोन देशांमध्ये एक सामंजस्य करार होतो. एखादा गुन्हेगार एका देशातून दुसऱ्या देशात जातो तेव्हा या कराराअंतर्गत त्याला परत पाठवण्याची व्यवस्था केली जाते.
8 / 10
पण या करारानंतरही गुन्हेगारांना सहजपणे भारतात आणणं शक्य होत नाही. कारण गुन्हेगार संबंधित देशातील प्रशासनाकडे भारतातील तुरुंगात आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देतात किंवा आपल्याला रस्त्यातच संपवलं जाईल असा दावा करतात. काहीवेळा तर गुन्हेगार भारतातील वातावरण आपल्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचंही कारण युक्तिवादात देतात.
9 / 10
ज्या देशाशी प्रत्यार्पण करार झालेला नाही अशा देशात एखादा गँगस्टर लपला असेल तर अशावेळी इंटरपोल उपयोगी ठरतं. इंटरपोल म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन जी जगातील सर्वात मोठी पोलीस संघटना आहे. याचं मुख्य कार्यालय फ्रान्समध्ये आहे आणि ही पोलीस संस्था आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत करते.
10 / 10
जगातील १९५ देश या इंटरपोलचे सदस्य आहेत. भारत देखील सदस्य देश आहे. जेव्हा एखादा गुन्हेगार पोलीस एजन्सीपासून बजावासाठी दुसऱ्या देशात पळ काढतो तेव्हा त्याचा शोध घेण्यासाठी इंटरपोलकडून नोटीस जारी करण्याची अपील केली जाते.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी