शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दुसऱ्या मुलीसोबत लग्न होता सैनिक प्रियकर, 'बॅंड-बाजा-बारात' घेऊन त्याच्या घरी पोहोचली प्रेयसी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 10:26 AM

1 / 9
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधून एका प्रेम प्रकरणाची हैराण करणारी घटना समोर आली आहे. प्रेयसीला जेव्हा समजलं की, तिचा प्रियकर दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय तेव्हा प्रेयसी बॅंड पार्टी आणि आपल्या नातेवाईकांना घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. नंतर प्रेयसीने प्रियकराच्या घरासमोर बराच वेळ हाय व्होल्टेज ड्रामा केला.
2 / 9
प्रियकरासोबत लग्न लावून दिलं नाही तर आत्महत्या करेन अशी धमकी प्रेयसीने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तरूणीला समजावून सांगत परत पाठवले. या घटननंतर परिसरात लोकांची गर्दी झाली होती.
3 / 9
याप्रकरणी गोरखपूरचे एसपी मनोज कुमार अवस्थी यांनी सांगितले की, रामपूर रका येथे राहणारा संदीप मौर्या सेनेत सैनिक आहे. त्याचं त्याच्याच जातीतील एका तरूणीसोबत प्रेमप्रकरण होतं. पण घरातील लोकांनी त्याचं लग्न दुसऱ्याच मुलीशी ठरवलं होतं. यानंतर तरूणीने पोलिसात त्याच्या विरोधात तक्रार दिली. तरूणीने तक्रारीत सांगितले की, प्रियकर लग्न करत असल्याचं समजताच ती नातेवाईकांसोबत त्याच्या घरी पोहोचली.
4 / 9
पोलिसांनी सांगितले की, जेव्हा त्यांना कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची माहिती मिळाली ते घटनास्थळी पोहोचले आणि वातावरण शांत केलं. तरूणीने सांगितलं की, तिने याआधीही पोलिसात तक्रार दिली आहे. तिला कायद्यानुसार आर्मीमध्ये तक्रार करण्याचा अधिकार आहे.
5 / 9
एसपी मनोज कुमार अवस्थी म्हणाले की, कायदेशीरपणे एका घटनेची एकच एफआयआर करता येऊ शकते. कुणालाही यासाठी भाग पाडलं जाऊ शकत नाही की, त्याने एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करावं. तरूणाचं हे पहिलं लग्न आहे. तो कुठेही लग्न करू शकतो. तरूणीला समजावण्यात आलं.
6 / 9
तरूणी म्हणाली की, दोन वर्षाआधी तिची भेट तरूणासोबत झाली होती. तो तिच्या घरीही येत-जात होता. तरूणीने आरोप लावला की, प्रियकराने लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान त्याचं ट्रेनिंग सुरू झालं होतं. तेव्हाही तो येत-जात होता आणि संबंध ठेवत होता.
7 / 9
सेनेत नोकरी लागल्यावर त्याने लग्नास नकार दिला. जेव्हा तिला समजलं की, तो लग्न करतो आहे. ती बॅंड पार्टी घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. तरूणी म्हणाली की, जर तिचं लग्न प्रियकरासोबत झालं नाही तर ती त्याच्या घरासमोरच आत्महत्या करेल.
8 / 9
तरूणीच्या बहिणीने आणि नातेवाईकांने सांगितले की, संदीप मौर्या घरी येत-जात होता. यादरम्यान तरूणीच्या आई-वडिलांशी लग्नाबाबतही बोलणी केली होती. एकाच जातीचे असल्याने त्यांनीही होकार दिला होता. त्यानंतर त्याचं घरी येणं सुरूच होतं. जेव्हा त्याला सेनेत नोकरी लागली तेव्हा त्याने लग्नास नकार दिला.
9 / 9
कोर्टात हे प्रकरण विचाराधीन आहे. त्यामुळे त्याला लग्न आणि सेनेत नोकरी करण्याचा अधिकार नाहीये. पोलिसांनी त्याला अटक करावी. आई-वडिलांना वाचवण्यासाठी त्याने हायकोर्टातून आदेश आणला आहे. पण हा आदेश त्याच्यासाठी नाहीये. तरूणीने याप्रकरणी न्यायाची अपेक्षा ठेवली आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न