Groom finds his bride is 4 month pregnant after one month of marriage
काय सांगता! लग्नाच्या दीड महिन्यानंतर नव्या नवरीची बिघडली तब्येत, चेक केलं तर निघाली 4 महिन्यांची गर्भवती By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 1:19 PM1 / 8लग्नांबाबत आजकाल अशा अशा घटना ऐकायला मिळत आहेत, ज्याबाबत जाणून घेतल्यावर डोकं चक्रावून जातं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका गावात नवविवाहितेची तब्येत बिघडल्यानंतर अल्ट्रासाउंडमध्ये हैराण करणारं कारण समोर आलं. लग्नाच्या केवळ दीड महिन्यानंतरच नवविवाहिता 4 महिन्यांची गर्भवती निघाली. 2 / 8ही घटना उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातील एका गावातील आहे. नवविवाहित तरूणाने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 3 / 8पीडित तरूणाने सांगितलं की, गावात राहणाऱ्या नातेवाईकांच्या माध्यमातून गेल्या दीड महिन्याआधी त्याचं लग्न बाजूच्या जिल्ह्यातील एका तरूणीसोबत झालं होतं. पण संसाराला व्यवस्थित सुरूवात होण्याआधीच तरूण फसवणुकीचा शिकार झाला.4 / 8या प्रकरणामुळे सुखी संसाराचे स्वप्न रंगवणाऱ्या तरूणाला चांगलाच धक्का बसला आहे. तो म्हणाला की, लग्नाला दीड महिना झाला आणि त्याची पत्नी 4 महिन्यांची गर्भवती आहे. 5 / 8सासरच्या लोकांना हे प्रकरण तेव्हा समजलं जेव्हा लग्नाच्या काही दिवसांनंतर नव्या नवरीच्या पोटात अचानक वेदना झाल्या. तिला औषध देऊनही बरं वाटलं नाही. त्यानंतर घरातील लोक तरूणीला सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. इथे डॉक्टरांनी तरूणी गर्भवती असल्याचा संशय व्यक्त केला. 6 / 8अल्ट्रासाउंड रिपोर्ट आल्यावर तिचा पर्दाफाश झाला. तरूणी गर्भवती असल्याचं सिद्ध झालं. यानंतर सासरच्या लोकांनी तरूणीच्या कुटुंबियांना याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, तुमची मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. तरूणीच्या घरचे लोक तिच्या सासरच्या लोकांवर रागावले. दोन्ही परिवारात वाद झाला. 7 / 8अल्ट्रासाउंड रिपोर्ट आल्यावर तिचा पर्दाफाश झाला. तरूणी गर्भवती असल्याचं सिद्ध झालं. यानंतर सासरच्या लोकांनी तरूणीच्या कुटुंबियांना याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, तुमची मुलगी चार महिन्यांची गर्भवती आहे. तरूणीच्या घरचे लोक तिच्या सासरच्या लोकांवर रागावले. दोन्ही परिवारात वाद झाला. 8 / 8तरूणाने तरूणी, तिचे कुटुंबिय आणि तिच्या नातेवाईकांवर कठोर करण्याची आणि तिला तिच्या कुटुंबियांकडे परत पाठवण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची गंभीरतेने चौकशी केली जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications