Gujtath Boy revenge his brother fight killed 12 year old boy in surat
धक्कादायक!: भावाच्या भांडणाचा बदला; 13 वर्षांच्या मुलानं केली 12 वर्षांच्या मुलाची हत्या! By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 30, 2021 2:06 PM1 / 9गुजरातमधील सुरत जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भावाच्या भांडनाचा बदला म्हणून, एका 13 वर्षांच्या मुलाने एका 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली.2 / 9या 13 वर्षांच्या मुलाला आपल्या छोट्या भावासोबत एका दुसऱ्या मुलाने भांडण केल्याचा एवढा राग आला, की त्याने दांड्याने मारून त्याची हत्या केली.3 / 9संबंधित मुलाचा मृतदेह सूरतमधील पांडेसरा भागातील भेस्तानच्या झुडपात आढळून आला. यामुळे जवळ-पासच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.4 / 9या मुलाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एक दांडाही सापडला आहे.5 / 9हत्या झालेल्या मुलाचे वय साधारणपणे 12 वर्ष असावे. असे असताना या मुलाचा शत्रू कोण असू शकतो? या विचाराने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. यानंतर धक्कादायक प्रकार त्यांच्यासमोर आला. 6 / 9संबंधित मृतक मुलाचे आरोपी मुलाच्या 8 वर्षीय भावासोबत भांगडण झाले होते. येथे शिवीगाळही झाली होती, असे समजते.7 / 9आरोपी मुलाने याच भांडणाचा बदला घेण्यासाठी डोक्यात दांडा मारून संबंधीत मुलाची हत्या केली. 8 / 9पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला आहे.9 / 9क्राइम न्यूज... आणखी वाचा Subscribe to Notifications