बापरे! ९३ वर्षीय ‘या’ आरोपीला कोर्टानं ठरवलं दोषी; तब्बल ५ हजार २३० जणांच्या हत्येचा आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 11:49 AM
1 / 10 ९३ वर्षीय एका नाझी गार्डला जर्मनीच्या कोर्टाने ५ हजार २३० लोकांच्या हत्येसाठी दोषी ठरवलं आहे. या गार्डचं नाव ब्रूनो डे असं आहे. ब्रुनो ७५ वर्षांपूर्वी स्टॅथॉफ कंसेनट्रेशन कॅम्पमध्ये गार्ड होता. त्याठिकाणी नाझींना ठार मारण्यास मदत केल्याचा आरोप या व्यक्तीवर होता. 2 / 10 ब्रूनो डे पोलंडच्या डेस्क पूर्व येथील स्टॅथॉप कंसेनट्रेशन कॅम्पमध्ये ऑगस्ट १९४४ ते एप्रिल १९४५ पर्यंत गार्ड होता. दुसरं महायुद्ध संपल्यानंतर त्याच्याविरोधात केस सुरु होती. त्यावेळी त्यांचे वय १७ इतके होते. 3 / 10 अल्पवयीन असल्याने त्याला २ वर्षाची शिक्षा झाली. त्यानंतर या व्यक्तीला सोडण्यात आले, मात्र ज्या लोकांची हत्या झाली त्यांच्या नातेवाईकांना पुन्हा आवाज उठवला. 4 / 10 या व्यक्तीला देण्यात आलेली शिक्षा कमी असून हा आमच्यावर अन्याय असा आरोप हत्या केलेल्या लोकांच्या नातेवाईकांनी केला. 5 / 10 नाझी काळातील आरोपींना शिक्षा देण्याची प्रक्रिया जर्मनीच्या न्यायालयात कित्येक वर्षापासून सुरु आहे. नातेवाईकांच्या मागणीमुळे पुन्हा ब्रूनो डे यांच्यावर खटला चालवण्यात आला. 6 / 10 नातेवाईकांच्या वकिलांनी सांगितले की, या गार्डचं वय कमी होतं म्हणून त्याचे अपराध कमी झाले नाहीत. त्यामुळे इतक्या लोकांच्या हत्या केल्यामुळे त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी कोर्टासमोर केली. 7 / 10 ब्रूनो डे यांना हँम्बर्गच्या स्टेट कोर्टात हजर केले. त्यावेळी निळ्या रंगाचा सर्जिकल मास्क त्यांनी घातला होता. ब्रूनो यांना व्हिलचेअरवर आणण्यात आलं. जेव्हा न्यायाधीश शिक्षा सुनावत होते त्यावेळी ते नजर खाली करुन कोर्टात बसले होते. 8 / 10 न्यायाधीश अॅनी मायरे गोरिंग म्हणाले की, आपण केलेला गुन्हा निर्दयी होता. तुम्ही या कामात सामील होऊ नये असं असतानाही तुम्ही सामील झालात. आपण या हत्येच्या आदेशाचे पालन केले. आपण या खुनांचे समान गुन्हेगार आहात. आता तुम्हाला शिक्षा होईल. 9 / 10 ब्रुनो डे म्हणाले की, त्यांनी गॅस चेंबरमध्ये ओरडणार्या लोकांचे आवाज ऐकले होते. नंतर मृतदेह देखील बाहेर येताना पाहिले. यानंतर कधीच मला झोप आली नाही, दररोज रात्री त्याला भीतीदायक स्वप्न पडत असे. 10 / 10 नाझी छावण्यांमध्ये ६० हजाराहून अधिक यहूदी मारले गेले. जर्मनीशेजारील पोलंडमधील स्टुटोव्हो येथे अनेक कंसेनट्रेशन कॅम्प बांधले गेले. ज्यामध्ये या यहूदींना नाझी सैन्याने शिक्षा दिली होती आणखी वाचा