Hardik Pandya Watch Seized: Know the customs rules for importing goods from abroad
Hardik Pandya Watch: हार्दिक पांड्या तर अडकला; जाणून घ्या परदेशातून वस्तू आणतानाचे कस्टमचे नियम, नाहीतर... By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 2:17 PM1 / 9Hardik Pandya Watch: टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या दुबईवरून भारतात परतला. टी-२० वर्ल्डकपमध्ये तो खराब फॉर्ममध्ये असल्याने भारतीयांच्या चांगलाच निशाण्यावर होता. परंतू विमानतळावर येताच त्याला आणखी एका मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. त्याने परदेशातून आणलेली 5 कोटींची घड्याळे विमानतळावर जप्त करण्यात आली. कस्टम विभागाने ही कारवाई केली. 2 / 9तसा कस्टम विभाग सोन्याची तस्करी पकडल्यानंतरच चर्चेत येतो. परंतू आता हार्दिक पांड्यामुळे चर्चेत आला आहे. पांड्याला अडवून या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडील करोडोंची दोन घड्याळे जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही घड्याळे खरेदी केल्याचे बिल पांड्याकडे नव्हते. या साऱ्या घटनाक्रमावर हार्दिक पांड्याने खुलासा केला आहे. ही घड्याळे पाच नाही तर दीड कोटींची असल्याचा त्याचा दावा आहे. तसेच कस्टम विभागाला आवश्यक कागदपत्रे पुरविणार आहे. 3 / 9परदेशातून वस्तू आणण्यासाठी काही नियम आहेत, जे तुम्हाला माहिती असायला हवेत. तुम्ही जरी परदेशात जात नसला तरी तुमचे नातेवाईक, मित्र आदी जात असतात. यामुळे माहिती असलेली कधीही फायद्याची ठरू शकते. नाहीतर दंडाबरोबरच शिक्षा आणि मनस्ताप होऊ शकतो. सीबीआयसीच्या वेबसाईटवर याची माहिती दिली आहे. 4 / 9परदेशातून आणलेल्या कोणत्याही वस्तूची माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. मालाची किंमत, खरेदीशी संबंधित माहिती सीमाशुल्क विभागाला द्यावी लागेल.5 / 9जर बाहेरून आणलेला माल भारतात उपलब्ध असेल, तर त्याची इथली किंमत आणि बाहेरून आणलेल्या मालाची किंमत यांचीही तुलना केली जाते.6 / 9कोणत्याही देशातून भारतात वस्तू आणण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. अनेक देशांसाठी कस्टम ड्युटी स्वस्त आहे, तर विमानतळांवरही ग्रीन आणि रेड चॅनेल बनवले जातात.7 / 9बहुतांश भारतीय दुबईहून सोने, दागिने यासारख्या वस्तू खरेदी करतात. अशा परिस्थितीत येथे कस्टम ड्युटीमध्ये सूट देण्यात आली आहे. सोन्याच्या दागिन्यांवर विविध प्रकारचे शुल्क आकारले जाते, ज्यामध्ये बिस्किटांच्या रूपात सोने आणण्यावर अधिक शुल्क आहे.8 / 9कोणत्याही व्यक्तीला परदेशातून येताना एक फॉर्म भरावा लागतो, जर तुम्ही असा कोणताही माल आणत असाल ज्यावर शुल्क लागू नसेल, तर वस्तू ग्रीन-चॅनेलमधून काढता येतील. पण ड्युटीचा माल रेड चॅनेलमधून काढावा लागतो.9 / 9तुम्ही कोणत्याही वस्तूंवर कस्टम ड्युटी न भरल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये शिक्षेचीही तरतूद आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications