Haryana hisar man arrested for faking death for insurance fund of Rs 2 crore
बापरे! पठ्ठाने विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी रचला स्वतःच्या मृत्यूचा बनाव अन् दिली कार पेटवून By पूनम अपराज | Published: October 10, 2020 8:39 PM1 / 8पोलिसांचा असा दावा आहे की, त्या व्यक्तीने 2 कोटी रुपये विम्याची रक्कम मिळवण्यासाठी स्वत: च्या मरणाची बतावणी केली आणि एकाला गाडीत जाळले. 2 / 8हरियाणा पोलिसांनी या व्यक्तीस छत्तीसगडमधून जिवंत पकडले आहे आणि ते पुन्हा हरियाणा येथे परत येत आहेत.3 / 8७ ऑक्टोबर रोजी हिसारच्या हांसी गावातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. त्या वृत्तानुसार, येथे दोन दरोडेखोरांनी एका व्यावसायिकाला कारमध्ये जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे.4 / 8पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही गुंड दुचाकीवरून कारचा पाठलाग करत होते. धोक्याची जाणीव झाल्यावर व्यावसायिकाने फोनवर आपल्या कुटूंबाला सांगितले की, काही लोक कारमध्ये त्याच्या मागे येत आहेत.5 / 8घटनास्थळी कुटूंब आणि पोलिस पोहचण्यापूर्वी गुंडांनी कार पेटवून दिली होती. कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले तेव्हा कार व त्यामध्ये बसलेली व्यक्ती पूर्णपणे जळून खाक झाली होती. 6 / 8या प्रकरणात, ज्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे, त्याचे नाव राम मेहर आहे. या व्यक्तीची बरवाला येथे डिस्पोजेबल काचेची फॅक्टरी आहे. मंगळवारी रात्री उशिरा तो आपल्या कारसह कुठेतरी जात होता असा दावा केला जात असून त्याच्याकडे 11 लाखांची रोकडही होती. त्यावेळी असा दावा केला जात होता की, दरोडेखोरांनी व्यावसायिकाकडून 11 लाख रुपये लुटले आणि त्याला गाडीसह जाळून टाकले.7 / 8त्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे हिसारचे पोलिस स्टेशन प्रभारी म्हणाले होते की, व्यापारी जात होता. त्यावेळी दोन दुचाकीस्वारांनी कारला वेढा घातला आणि गाडी रोखल्यानंतर आणि पैशांची लूट केली. जेव्हा हिसार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा त्यांना या प्रकरणात एक गडबड दिसली, तपासणीदरम्यान पोलिसांनी या व्यक्तीला छत्तीसगडमध्ये जिवंत पकडले आणि त्याला अटक केली. तेव्हा पोलिस आश्चर्यचकित झाले. विम्याचे 2 कोटी रुपये हडपण्यासाठी या व्यक्तीने स्वत: ला मारण्याचा कट रचला असा पोलिसांचा दावा आहे.8 / 8पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यावसायिकाच्या कुटुंबाचा असा दावा आहे की, गुंडांनी त्याचे अपहरण केले आहे आणि त्याच्याबरोबर दरोडा देखील टाकला होता, परंतु जेव्हा पोलिस गुन्हेगारीच्या ठिकाणी पोहोचले तेव्हा येथून हा कट उघडकीस आला. तपासणी दरम्यान त्याच्या नावावर कोटय़वधी रुपयांचा विमा असल्याचे आढळले आहे. राममेहरच्या मृत्यूनंतर ही रक्कम त्याच्या कुटुंबीयांना दिली जाणार होती. याशिवाय त्याचा व्यवसाय चांगला चालत नसल्याचे आणि त्याच्यावर काही कर्ज असल्याचेही तपासात उघड झाले. ज्याचा जळालेला मृतदेह गाडीतून सापडला. तो माणूस कोण होता याचा पोलिस आता तपास करीत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications