शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हृदयद्रावक! २ महिन्याच्या चिमुरडीचा गळा दाबला अन् ओव्हनमध्ये टाकले; निर्दयी आईनं असं का केले?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 3:04 PM

1 / 6
मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. शोध घेतला असता, अनन्याचा मृतदेह ओव्हनमध्ये आढळून आला. दोन तासांत मुलगी ओव्हनमध्ये मृतावस्थेत आढळून आली. (All Photo - Amar Ujala)
2 / 6
देशाची राजधानी दिल्लीतून ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कलियुगी आईने आपल्याच दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीची गळा आवळून हत्या केली. गळा दाबल्यानंतर महिलेने मुलीला ओव्हनमध्ये ठेवले. आईच्या क्रूरतेमुळे जीव गमावलेल्या निष्पाप मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. ही घटना दिल्लीतील मालवीय नगर पोलीस स्टेशन हद्दीतील चिराग दिल्ली गावातील आहे.
3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, चिराग दिल्ली गावात एका महिलेने मुलाच्या हव्यासापोटी आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर आरोपी महिलेने मृतदेह घराच्या छतावर पडलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये लपवून ठेवला. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. घरात झडती घेतली असता अनन्या कौशिक हिचा मृतदेह आढळून आला.
4 / 6
मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. सध्या पोलिसांनी मुलीच्या पालकांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुलशन कौशिक हे चिराग दिल्ली गावात आपल्या कुटुंबासह राहतात. कुटुंबात पत्नी डिंपल कौशिकशिवाय चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांची मुलगी अनन्या कौशिक होती. गुलशनची आई आणि भाऊही त्याच्यासोबत राहतात आणि घराखाली किराणा दुकान चालवतात.
5 / 6
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी दुपारी 3.15 च्या सुमारास चिराग दिल्ली गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुलीची आजी घरात मुलीचा शोध घेत होती.
6 / 6
पोलिसांनी घरात झडती घेतली असता मुलीचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये दोन महिन्याच्या चिमुकलीचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीच्या आजीने मुलीचा मृतदेह बाहेर काढला. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आणि मुलीच्या पालकांना ताब्यात घेतले.
टॅग्स :Deathमृत्यूdelhiदिल्लीPoliceपोलिस