शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! नराधमांनी सोशल मीडियावर व्हायरल केला बलात्काराचा व्हिडीओ, पतीने घेतला घटस्फोट....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 10:17 AM

1 / 10
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बलियामधून (Ballia) एक संतापजनक घटना समोर आली आहे. इथे एका २२ वर्षीय तरूणीसोबत आधी बलात्कार (Rape) करण्यात आला आणि त्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Ballia Rape Video Viral On Social Media) करण्यात आला. हा व्हिडीओ तरूणीच्या पतीपर्यंत पोहोचला आणि त्याने तिच्यासोबत लग्न तोडलं.
2 / 10
ही घटना आहे बलियातील रेवती परिसरातील. इथे एका तरूणीवर अत्याचाराची सीमा गाठली. आधी तरूणीवर निर्दयीपणे बलात्कार करण्यात आला.
3 / 10
इतकेच नाही तर नराधमांनी बलात्कार करताना व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ नंतर त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल (Rape Video Viral) केला.
4 / 10
या घटनेबाबत पोलीस अधिकारी प्रवीण सिंह यांनी सांगितले की, तरूणीसोबत गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात बलात्कारर करण्यात आला होता. नंतर बदनामीच्या भीतीने तरूणीच्या कुटुंबियांनी तिचं लग्न लावून दिलं.
5 / 10
त्यानंतर पीडिता सासरी गेली. कुटुंबियांनी तिला सांगितले होते की, बदनामी होऊ नये म्हणून याबाबत कुणालाही काही सांगू नको.
6 / 10
पोलिसांनी सांगितले की, नरेंद्र नावाच्या एका तरूणाने पीडितेसोबत कथितपणे बलात्कार केला होता. यादरम्यान या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला होता.
7 / 10
नंतर आरोपीने त्याच्या चार मित्रांसोबत मिळून पीडितेसोबतचा बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला.
8 / 10
त्यांनी पुढे सांगितले की पीडितेसोबतचा बलात्काराचा व्हिडीओ काही दिवसांनी तिच्या पतीपर्यंत पोहोचला.
9 / 10
हा व्हिडीओ पाहून तो संतापला आणि त्याने तिच्यासोबतचं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याने तिच्यासोबतचं लग्न मोडलं
10 / 10
लग्न मोडल्यानंतर पीडितेने बलियाच्या रेवती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली. त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. इतर चार लोकांचा शोध सुरू आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशsexual harassmentलैंगिक छळSocial Mediaसोशल मीडिया