Husband Wife And Daughter Suicide Case Agra Police Investigation Mobile And Cctv Cameras
धक्कादायक! सुसाईड नोट लिहून ५ वर्षाच्या मुलीसह आई-वडिलांनी केली आत्महत्या By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2021 12:20 PM1 / 10आगरा येथील बॅटरी व्यावसायिक योगेश मिश्रा यांच्या आत्महत्येचा तपास करण्यासाठी सुसाईड नोट आणि मोबाईल लॅबमध्ये पाठवण्यात आला आहे. मोबाईल कॉल डिटेल्समधून महत्त्वाची माहिती मिळू शकते असा अंदाज पोलिसांना आहे. योगेश मिश्रा आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह बंशी विहार स्थित फर्मच्या कार्यालयात आढळला. तर ५ वर्षाच्या मुलीचा मृतदेह घरात सापडला. योगेश गळफास घेतलेल्या अवस्थेत होता तर पत्नी प्रती जमिनीवर पडली होती. सुसाईड नोटमध्ये दोघांच्या सह्या आढळल्या आहेत. 2 / 10ही आत्महत्या का झाली? याबाबत सुसाईड नोटमध्ये उल्लेख नाही. योगेशचा मोबाईल, आधारकार्ड आणि चप्पल घटनास्थळी सापडली. पोस्टमोर्टममध्ये प्रती आणि मुलगी काव्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे विसरा सुरक्षित ठेऊन लॅबमधअये पाठवण्यात आला आहे.3 / 10मोबाईल कॉल डिटेल्समधून योगेशने मृत्यूपूर्वी कोणाशी संवाद साधला ते समजेल. सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण लिहिलं नाही परंतु कदाचित सुसाईडच्या अगोदर जवळच्या व्यक्तीला सांगितले आहे का? योगेशला काय त्रास होता? हे कॉल डिटेल्समधून समोर येण्याची शक्यता आहे.4 / 10योगेश मिश्रा यांची बहिण सीमा मिश्रा यांनी सांगितले की, घटनेच्या दिवशी आई सरोज मिश्रा यांचा फोन आला होता. तेव्हा तिने दादा-वहिणी ऑफिसला गेल्याचं सांगितले. त्यामुळे तिला चहा मिळाला नाही. योगेशने घरात कार खरेदी करण्यासाठी जात असल्याचं सांगितले होते. 5 / 10त्यानंतर योगेशने घरी फोन करुन प्रतीची तब्येत खराब झाल्याचं कळवलं. त्यावर सीमाने योगेशला कॉल करुन प्रतीची विचारपूस केली. पण योगेश गाडी चालवत असल्याचं कारण देत त्याने फोन नंतर करण्यास सांगितले अशी माहिती सीमाने दिली.6 / 10पोलीस अधिकारी प्रवीण कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलीस जेव्हा बंशी विहार येथे योगेशच्या कार्यालयात पोहचली तेव्हा ऑफिसमध्ये पूजा घरात असलेला दिवा जळत होता. मुलगी आध्याला विचारलं असता योगेश गुरुवारी रात्री ऑफिसमधून प्रतीची हिला सोडून काव्या आणि आध्यासोबत घरी आला होता. 7 / 10काव्या त्यावेळी शुद्धीत नव्हती. मुलींना घरी सोडल्यानंतर पुन्हा योगेश ऑफिसला जात असल्याचं सांगून घरातून बाहेर पडला. रात्री १० वाजता तो परत घरी आला. त्यानंतर योगेशने आई आणि मोठ्या मुलीशी संवाद साधला. त्यानंतर काव्याच्या रुममध्ये जात झोपले होते.8 / 10आध्या आजीसोबत झोपली होती. शुक्रवारी सकाळी लवकर उठून ते ऑफिसला गेले होते. पूजा घरात दिवा जळत होता. योगेशने मृत्यूपूर्वी कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअप मेसेज केला होता. अलीकडेच योगेशने ऑफिसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले होते असं पोलीस म्हणाले.9 / 10पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचले तेव्हा या कॅमेऱ्याचा डिस्प्ले बंद होता. कदाचित सुसाईड पूर्वी योगेशने सर्व कॅमेरे बंद केले होते. आता डीवीआर फुटेजची पोलीस तपासणी करत आहेत. जर सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असते तर त्यांच्या हालचाली कळाल्या असत्या.10 / 10ऑफिससमोर असलेल्या एका घरात सीसीटीव्ही कॅमेरा लागलेत त्याठिकाणी योगेश कारमधून उतरून आत जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर तो बाहेर आला नाही. योगेशची कार तपासली परंतु त्यात काहीही सापडलं नाही. ज्यामुळे योगेशने सुसाईड करण्यासाठी काही तयारी केली असावी. आणखी वाचा Subscribe to Notifications