शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'मैं अपनी कुर्बानी दे रही हूं'; हतबल झालेल्या एका सीक्रेट सेक्स वर्करची सुन्न करणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 4:50 PM

1 / 13
अफगाणिस्तानात देहविक्रीचा व्यवसाय करणं बेकायदेशीर आहे. परंतु गरिबी आणि बिकट परिस्थिती पाहता सीक्रेट सेक्स वर्कर्स हा धोका पत्करतात. त्यामुळे दिवसेंदिवस देहविक्री करणाऱ्या सेक्स वर्कर्सची संख्या वेगाने वाढत आहे. कायद्यानुसार हा गुन्हा असला तरी त्याच्या शिक्षेचा उल्लेख नाही. पण पकडल्यानंतर जेलमध्ये पाठवलं जातं.
2 / 13
वूमेन अफेयर्स मिनिस्ट्रीच्या प्रवक्ता सांगतात की, देशात असणारी गरिबी आणि निरक्षरता देहविक्रीचं प्रमुख कारण आहे. सेक्सबद्दल लोकांची मानसिकता जास्त विकसित झाली नाही. विशेषत: कमी वयातील महिलांमध्ये याची समज कमी आहे. देहविक्रीच्या धंद्यात नेहमी या महिलांची फसवणूक केली जाते.
3 / 13
अफगाणिस्तानात सेक्स वर्कर्सची संख्या वाढत आहे. देहविक्रीसाठी पुरुष, महिला मित्रांचे घर, कॉफी शॉप, ब्यूटी पार्लसचा सहारा घेतात. याठिकाणी काम करणाऱ्या अनेक सेक्स वर्कर्सनं नाव न छापण्याच्या अटीवर इंग्लिश वेबसाईट द गार्जियन यांच्याकडे हा खुलासा केला.
4 / 13
वडिलांच्या मृत्यूनंतर जैनब(बदललेलं नाव)च्या खांद्यावर ५ भावाबहिणींसह घराची जबाबदारी पडली. तिने शाळा सोडली आणि हाऊसकीपर म्हणून फुलटाईम जॉब केला. एकदा तिच्या भावाची तब्येत बिघडली तेव्हा कंपनीच्या मालकाकडे काही पैसे मागितले. त्यानंतर पैसे देण्याऐवजी सांगितलं तू वर्जिन आहेत. खूप पैसे कमवशील. मी तुझ्यासाठी एक ग्राहक आणू शकतो.
5 / 13
वास्तविक या कंपनीचा मालक छुपा वेश्याव्यवसाय चालवत होता. ज्याबद्दल जैनबला माहिती नव्हती. अखेर वाईट परिस्थितीसमोर ती हतबल झाली आणि या धंद्यात उतरली. २० वर्षाची जैनब आज आठवड्याला २-३ ग्राहक सांभाळते. प्रत्येकाकडून तिला १८०० रुपये मिळतात.
6 / 13
जैनब सांगते की, माझं वय १३ वर्ष होतं तेव्हा वडिलांचे निधन झाले. आई वृद्ध होती आणि आजरीही. त्यासाठी कुटुंबाची जबाबदारी मला उचलावी लागली. सुरुवातीला मी हाऊसकीपर म्हणून नोकरी केली. परंतु त्या पैशातून घराच्या गरजा भागवणं कठीण होत होतं.
7 / 13
काळ्या बुरख्यात बसलेल्या जैनबनं ही मुलाखत तिचा फोटो, नाव, ओळख आणि तिच्या कामाची जागा गोपनीय ठेवली जाईल या अटीवर दिली आहे.
8 / 13
जैनबनं सांगितलं की, तिच्या जवळ येणारे बहुतांश ग्राहक २५-३० वयोगटातील असतात. त्यातील अनेकजण लग्न झालेले असतात. ते सगळे माझ्या मालकाला ओळखतात. त्यांच्याकडून वेळ फिक्स केली जाते. अनेक पुरुष मुलींची निवड करण्यासाठीही विनंती करतात.
9 / 13
जैनबनं सांगितले की, तिच्या ग्राहकांमध्ये कोणी १० मिनिटं वेळ घेतं तर कोणी २० मिनिटं. काही कॉन्डम वापरतात तर काही नाही. इतकचं नाही तर मालकाकडून आम्हाला प्रेग्नेंसी होऊ नये यासाठी रोज इंजेक्शन दिले जाते. परंतु त्याने आजारी पडण्याची भीती राहते. माझ्या कोणत्या मित्राला अथवा घरच्यांना माहिती नाही. मी हाऊसकीपरची नोकरी करतेच हेच त्यांना वाटतं.
10 / 13
ह्युमन राईट्स वॉच महिला अधिकाऱ्याने एकदा सांगितले की, मी २०१२ मध्ये पहिल्यांदा सेक्स वर्कर्सना भेटली होती. ज्यांच्याकडं आयुष्य जगण्यासाठी काही मार्गच शिल्लक नाही त्यांनी देहविक्रीला सुरुवात केली. त्यामुळे महिला या व्यवसायात उतरण्यामागं सरकारचं अपयश दिसून येते.
11 / 13
जैनब म्हणाली की, तिने मालकाकडे अनेक महिलांना काम करताना पाहिलं आहे. परंतु कधी त्यांच्याशी बोलली नाही. जे काम करतोय त्याबद्दल बोलताना लाज वाटते. काबूलमध्ये अनेक सेक्स वर्कर्सना ओळखते पण कधी भेटली नाही. २८ वर्षीय जाविदला तीन मुलं आहेत. त्याच्या पत्नी आणि मुलांना त्याच्या या व्यवसायाबद्दल काही माहिती नाही.
12 / 13
जावेद सांगतो की, अनेकदा काही जण पुरुषांसोबत संबंध बनवतात. मला पैशांची गरज आहे. त्यामुळे मी या धंद्यात उतरलो. आता माझ्याकडे अनेक ग्राहक आहेत. ते मला पैसै देतात. या पैशातून माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातोय
13 / 13
आता या दलदलीतून बाहेर पडू शकत नाही असं जैनब आणि जावीद सांगतात. मी माझ्या कुटुंबासाठी स्वत:ला कुर्बान करत आहे असं जैनब म्हणते. कारण मी यातून बाहेर पडले तर माझ्या कुटुंबाचे भाऊ बहिणींच्या गरजा कशा भागवणार हा प्रश्न मला पडतो.
टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनAfghanistanअफगाणिस्तान