शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चेहरे आले समोर ! दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या १२ जणांचे फोटो दिल्ली पोलिसांनी केले प्रसिद्ध 

By पूनम अपराज | Published: February 03, 2021 2:35 PM

1 / 6
या सर्वांवर लाल किल्ल्यावर तणावाचे वातावरण असताना पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. यापूर्वी, दिल्ली पोलीस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराशी संबंधित 1000 व्हिडिओ मिळवल्याचे सांगितले होते. पोलीस आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
2 / 6
26 जानेवारी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेची एसआयटीने दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या 12 जणांना शोधत आहे. गुन्हे शाखेची एसआयटी हिंसाचाराचा तपास करीत आहे.
3 / 6
लाल किल्ल्यासह बर्‍याच ठिकाणी हिंसाचाराच्यावेळी पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 12 हल्लेखोरांच्या हातात लाठी आहेत. दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांना ओळख पाठवण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास करणार्‍या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने फॉरेन्सिक टीमच्या मदतीने हिंसाचार माजवणाऱ्यांचे फोटो काढण्यास सुरवात केली आहे.
4 / 6
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्हिडिओत  12 जणांचे चेहरे दंगा करताना दिसतात. या हल्लेखोरांच्या हातात काड्या व दांडेही दिसत आहेत. या लोकांनी लाल किल्ल्यासह अनेक ठिकाणी पोलिसांवर भयंकर हिंसाचार आणि हल्ले केले. फोटो स्पष्ट झाल्यानंतर आरोपींचे चेहरे स्पष्टपणे ओळखता येतील. दिल्ली पोलिसांच्या वतीने एक संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. ज्या क्रमांकावर सर्वसामान्य लोक पोलिसांना हिंसाचार करणाऱ्यांची माहिती देऊ शकतील. 
5 / 6
पोलिसांच्या म्हणण्यानुसार तपासाच्या सुरूवातीलाच हे फोटो स्पष्ट करण्यात आले आहेत. पोलिसांकडे हिंसाचाराशी संबंधित अनेक व्हिडिओ आहेत.
6 / 6
ते व्हिडीओ फॉरेन्सिक टीमकडून तपासले जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी मोर्चात हिंसाचार करणाऱ्या हल्लेखोरांचे चेहरे देखील समोर येऊ शकतात. सध्या आरोपींविरोधात कारवाई करत पोलिसांनी 44 गुन्हे दाखल केले आहेत. त्याचवेळी आतापर्यंत 122 लोकांना अटक केली गेली आहे.
टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरीPoliceपोलिस