शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी महिलेने केलं गुगल सर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 12:58 PM

1 / 10
मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची हत्या केली. इतकंच नाही तर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिने गुगलवर सर्च केलं. पोलिसांनी सांगितलं की, तपासातून समोर आलं की, लॉकडाऊन दरम्यान प्रियकराला भेटण्यात पती आडकाठी ठरत होता.
2 / 10
पोलिसांन २४ तासांच्या आतच या प्रकरणाचा खुलासा करत आरोपींना न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी सांगितलं की, मृतकाच्या हत्येची सूचना स्वत: त्याच्या पत्नीने दिली होती. पण तिने तेव्हा तिचं नाव सांगितलं नव्हतं. एक अज्ञात म्हणून तिने माहिती दिली होती.
3 / 10
तपासादरम्यान पोलिसांनी मृतकाच्या पत्नीवर संशय आला आणि पोलिसांना खाकी हिसका दाखवला. तेव्हा तिने तिचा गुन्हा कबूल केला. त्यानंतर पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली.
4 / 10
तेच या प्रकरणाची माहिती देताना एसपी मनीष कुमार अग्रवाल यांनी सांगितलं की, खेडीपुरा भागात १८ जून रोजी आमिरची हत्या झाली होती. २४ तासात पोलिसांनी या केसचा छडा लावला. एसपी यांनी सांगितलं की, प्रेम प्रसंगामुळे महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून ही हत्या केली.
5 / 10
प्रकरणची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आणि परिवारातील सर्वच सदस्यांचे कॉल डिटेल्स काढले. ज्यातून समोर आलं की, आमिरची हत्या त्याची पत्नी तबस्सुमने तिचा प्रियकर इरफानसोबत मिळून केली.
6 / 10
आरोपींकडून पोलिसांनी हत्येसाठी वापरलेली हातोडी, रक्ताने माखलेले कपडे, मोबाइल फोन मृतकाचे हात बांधण्यासाठी वापरलेली ओढणी ताब्यात घेतली आहे.
7 / 10
पोलिसांच्या तपासातून समोर आलं की, इरफान आधी महाराष्ट्रात काम करत होता. आर्थिक अडचणीत असलेल्या तबस्सुमला इरफानने बरीच मदत केली. त्यामुळे दोघांची जवळिकता वाढली. लॉकडाऊन लागल्याने आमिर गावात येऊन राहू लागला होता. आमिरला दोघांचं भेटणं पसंत नव्हतं. म्हणूनच तबस्सुम आणि इरफानने आमिरची हत्या करण्याचा प्लॅन केला होता. त्यांनी आधी आमिरला बेशुद्ध केलं.
8 / 10
त्यानंतर इरफान घरी आला आणि त्याने तबस्सुमसोबत मिळून पतीची हत्या केली. पोलिसांनुसार, इरफान आणि तबस्सुमने आमिरचे हातपाय दुपट्ट्याने बांधले. त्यानंतर इरफानने आमिरच्या डोक्यावर हातोडीने लागोपाठ वार केले.
9 / 10
या घटनेची सूचना मृतकाच्या पत्नीनेच पोलिसांना दिली. सुरूवातीला पोलिसांना वाटलं की, ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असेल. पण घटनास्थळी काही पुरावे सापडल्याने पोलिसांना महिलेवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल डिटेल्स काढले.
10 / 10
तेव्हा पोलिसांना समजलं की, ती नगरपालिकेत कर्मचारी असलेल्या इरफानसोबत जास्त बोलत होती. पोलिसांनी तिची गुगल हिस्ट्री शोधली तर ते हैराण झाले. तबस्सुमने गुगल सर्च केलं की हत्येनंतर मृतदेहाचे हात-पाय कसे बांधायचे आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी