शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! सूनेच्या प्रेमात आंधळा झालेल्या सासऱ्याने आपल्या १६ महिन्याच्या मुलाला नदीत फेकलं....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 4:40 PM

1 / 8
यूपीच्या कासगंज जिल्ह्यात पवित्र नात्यांना काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे सासरे आणि सूनेच्या अनैतिक संबंधाच्या नादात एका १६ महिन्यांच्या बाळाचा जीव गेलाय. हा जीव स्वत: बाळाच्या वडिलाने घेतला. सूनेच्या प्रेमात सासरा इतका आंधळा झाला की, त्याने त्याच्या १६ महिन्याच्या निष्पाप मुलाला नदीत फेकलं. (All Image Credit : Aajtak)
2 / 8
धक्कादायक बाब म्हणजे मुलाला नदीत फेकल्यावर वडिलच पोलिसात त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार देण्यासाठी गेला. पोलीस काही हालचाल करणार इतक्यात आरोपीच्या मोठ्या मुलाने पोलिसांसमोर आपली पत्नी आणि त्याच्या वडिलांमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाचा भांडाफोड केला. तसेच आपल्या लहान भावाच्या हत्येचा आरोपही वडिलांवर लावला.
3 / 8
पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्या वडिलाला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. नदीत बाळाचा शोध घेतला जात आहे. पण पाणी वाहतं असल्याने अजूनपर्यंत मृतदेह सापडला नाही.
4 / 8
हे लाजिरवाणं आणि निर्दयी कृत्य कासगंज शहरातील ज्वालापुरी भागातील किशन कुमार याने केलं आहे. आरोपीचा मोठा मुलगा सचिन याच्यानुसार, त्याच्या पत्नीसोबत त्याच्या वडिलांचे अनैतिक संबंध होते. त्यामुळेच त्यांनी त्याचं लग्न या महिलेशी लावून दिलं होतं.
5 / 8
लग्नानंतर किशन कुमार म्हणजे सासरा सूनेसोबत संबंध ठेवत राहिला. दोघांचं नातं इतकं पुढे गेलं की, दोघांनी सोबत जगण्या-मरणाच्या शपथा घेतल्या. अशातच किशन कुमारच्या पत्नीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. पण ही गोष्ट त्याच्या सूनेला आवडली नाही. यावरून सासरे आणि सूनेत भांडण झालं. त्यांचे संबंध तुटण्याच्या उंबरठ्यावर होते. पण प्रेमात आंधळा झालेल्या किशन कुमारने १६ महिन्यांच्या मुलाला संपवण्याचा निश्चय केला. १६ महिन्यांचा मुलगा यशला २७ जानेवारीला नदीत फेकलं आणि पोलिसात जाऊन मुलाच्या अपहरणाची सूचना दिली.
6 / 8
पोलीस याची चौकशी करणार इतक्यात किशनचा मोठा मुलगा सचिन याने आपले वडील आणि आपल्या पत्नीच्या कारनाम्याचा भांडाफोड केला. पोलिसांनी किशन कुमार आणि त्याच्या सूनेला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान हे समजलं की, किशन कुमारने त्याच्या लहान मुलाला नदीत फेकलं होतं.
7 / 8
सध्या पोलीस आरोपी वडिलांच्या कबुलीनंतर निष्पाप यशच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. मोठा मुलगा सचिन याने सांगितले की, माझा भाऊ रात्री झोपला होता. आम्हीही झोपलो होतो. सकाळी उठलो तर तो घरात नव्हता. पोलिसांना माहिती दिली. मला माझे वडील आणि माझ्या पत्नीवर संशय आहे. माझ्या वडिलांनी याआधीही अनेक प्रयत्न केले आहेत. वडील आणि माझ्या पत्नीचं अनेक वर्षांपासन अफेअर सुरू आहे.
8 / 8
कासगंज एसपी मनोज कुमार सोनकर यांनी सांगितले की, २८ फेब्रुवारीला सचिन ज्वालापुरीने पोलिसात सूचना दिली गेली. त्यात त्याने लिहिले होते की, त्याच्या वडिलाने आणि पत्नीने १६ महिन्याच्या यशला गायब केलं. त्यांनंतर दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांनी त्यांचा गुन्हा मान्य केलाय. किशन कुमारने सांगितले की, जमिनीवर छोटा मुलगा झोपला होता. त्याला चादरीत गुंडाळून गाडीने जाऊन नदीत फेकून आलो. मुलाचा शोध घेतला जात आहे. पाणी वेगाने वाहत असल्याने अडचणी येत आहेत.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी