अनैतिक संबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीनंच काढला काटा; दोन बायका असलेल्या पतीची हत्या By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 10:56 AM
1 / 12 बीड जिल्ह्याच्या गेवराईमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 / 12 गेवराई तालुक्याच्या तलवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजापूर शिवारात शनिवारी एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली होती. 3 / 12 या प्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती व्रण होते. 4 / 12 घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आणि केवळ २४ तासांच्या आत आरोपींना गजाआड केलं आहे. 5 / 12 संबंधित हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. ३२ वर्षीय मृत नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असून तो गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील रहिवासी होता. 6 / 12 ज्ञानेश्वरचा मृतदेह शनिवारी राजापूर शिवारातील एका शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर अनेक ठिकाणी जखमा होत्या, तर गळ्याभोवती फास दिल्याचे व्रणही होते. 7 / 12 या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. तपास करत असताना पोलिसांच्या लक्षात आले की, मृत ज्ञानेश्वरची हत्या दुसरी कुणी नाही तर त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने केली. 8 / 12 त्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली. यानंतर ही हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याची माहिती उघड झाली आहे. 9 / 12 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत ज्ञानेश्वरला दोन बायक्या होत्या. यातील पहिल्या बायकोचे आरोपी नाना अप्पा शिंदे याच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. 10 / 12 मागील काही दिवसांपासून त्यांच्यात जवळीक वाढली होती. पण मृत ज्ञानेश्वर त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. 11 / 12 त्यामुळे मृत ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीनं आणि तिच्या प्रियकरानं ज्ञानेश्वरच्या हत्येचा कट रचला आणि त्यानुसार त्यांनी त्याची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी ज्ञानेश्वरचा मृतदेह गेवराई तालुक्यातील राजापूर शिवारात नेवून फेकला. 12 / 12 या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालात हत्या केल्याची स्पष्ट करण्यात आली आहे. आणखी वाचा