Interpol's warning came true; cyber Attack on Pfizer data in UK
इंटरपोलचा इशारा खरा निघाला; ब्रिटनमध्ये फायझरच्या डेटावर सायबर हल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 12:49 PM1 / 11कोरोना लसीची चर्चा जगभरात होऊ लागली आहे. काही कंपन्या ही लस बनविण्यात यशस्वी झाल्या असून ब्रिटनने आपत्कालीन लसीकरणही सुरु केले आहे. रशिया, बहारीन, अमेरिका या वाटेवर असताना आता फायझर कंपनीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 2 / 11फायझर आणि बायोएनटेकने ब्रिटनमध्ये ज्या सरकारी संस्थेला कोरोना लसीसाठी मंजुरी अर्ज पाठविण्यात आला होता, तिथे सायबर हल्ला झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. या संस्थेतून हॅकर्सनी कोरोना लसीचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला आहे. 3 / 11वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात सांगितले की, या कंपन्यांच्या कागदपत्रांची चोरी करण्याचा प्रयत्न अशावेळी झाला आहे, जेव्हा जगभरातील देष कोरोना लसीकरणाच्या मोहिमेवर तयारी करू लागले आहेत. 4 / 11फायझर आणि बायोएनटेकने सांगितले की, लसीबाबतच्या कागदपत्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला आहे. 5 / 11आमच्या खासगी डेटापर्यंच कोणी पोहोचले असल्याचे आढळले नाहीय. सायबर हल्ल्याची समिक्षा करण्यासाठी अधिक वेळ लागणार नसल्याचे युरोपीय मेडिसिन एजन्सीने आश्वासन दिले आहे, असे कंपनीने सांगितले. 6 / 11युरोपीय औषधोपचार एजन्सी (इएमए) युरोपीय संघासाठी औषधांचे आणि लसींचे परीक्षण करते. या संस्थेवरच हा हल्ला झाला आहे. 7 / 11ब्रिटनमध्ये फायझरची लस देण्यात येत आहे. लस टोचल्यानंतर अनेकांना अॅलर्जी देखील झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे संशोधकांची काळजी वाढली आहे. 8 / 11दोन्ही पीडित आरोग्य कर्मचारी Anaphylactoid Reactions चे शिकार झाले आहेत. त्यानंतर ब्रिटनच्या रेग्युलेटरी एजन्सीने एक इशारा जारी केला आहे. अशा कुठल्याही व्यक्तीला ज्यांना कुठलेही औषध, अन्न आणि लसीची अॅलर्जी आहे, अशांना फायझरची लस देण्यात येऊ नये, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे.9 / 11भारतातही आपत्कालीन लसीकरणासाठी फायझरने पहिलाच अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सिरमने आणि त्यानंतर भारत बायोटेकने अर्ज केला आहे. 10 / 11लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ब्रिटनकडून कोरोनाच्या आठ लाख डोसचा वापर करण्यात येणार आहे. मात्र ख्रिसमसपर्यंत देशामध्ये कोरोनाच्या लसीचे लाखो डोस उपलब्ध होतील, असे ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी सांगितले.11 / 11इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. तसेच इंटरपोलचे १९४ देश सदस्य आहेत. या सर्व देशांना इंटरपोलने सावध राहण्याचा व या संघटित गुन्हेगारांचे हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications