1 / 7गुगलने नुकतीच कॉल रेकॉर्डिंग करणारी अॅप प्ले स्टोअरवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पहायला गेल्यास गुगल अँड्रॉईडच्या आधीपासून मोबाईलमध्ये कॉल रेकॉर्डिंग केले जाते. परंतू ते बेकायदेशीर आहे, म्हणजे शिक्षेस पात्र आहे. जर तुम्ही अशी चूक केल्यास आणि त्याची तक्रार झाली तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. यामुळे सावध रहा...2 / 7मोबाईल निर्मात्या कंपन्या कॉल रेकॉर्डिंगचा ऑप्शन देत आहेत. परंतू, एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला याची माहिती असणे गरजेचे आहे. कॉल रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला संबंधीत अथॉरिटीची परवानगी घ्यावी लागते. यानंतरच तुम्ही एखाद्याचा कॉल रेकॉर्ड करू शकता. 3 / 7यासाठी तुम्हाला पोलीस कमिशनर, अधीक्षक कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी ठोस कारण द्यावे लागेल, त्यानंतर ते कारण पटले तर पोलीस परवानगी देतील. 4 / 7मात्र, या परवानगीशिवाय जर तुम्ही कॉल रेकॉर्डिंग केले तर ते बेकायदेशीर असल्याचे समजले जाईल. जर कोणी व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर तुम्ही त्याच्या विरुद्ध एफआयआर दाखल करू शकता किंवा न्यायालयात जाऊ शकता. कारण एखाद्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन मानले जाते. 5 / 7भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक व्यक्तीला गोपनीयतेचा अधिकार आहे. कोणत्याही तृतीय पक्षाच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे पूर्णपणे बेकायदेशीर मानले जाते. यासोबतच हे घटनेतील व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचेही उल्लंघन ठरेल.6 / 7 Indian Evidence Act, 1872 नुसार प्रत्येक कॉल रेकॉर्ड न्यायालयात सादर केला जाऊ शकतो. त्याच्या काही अटी आहेत. रेकॉर्ड केलेला आवाज स्पष्ट आणि ओळखण्यायोग्य असणे आवश्यक आहे. रेकॉर्डिंगमध्ये कोणताही हस्तक्षेप नसावा आणि तो केसशी संबंधित असावा. रेकॉर्डिंग स्टोरेज उपकरणे सीलबंद करणे आणि पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे.7 / 7कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोटो काढणे आणि व्हिडिओ शूट करणे हे देखील कलम 21 चे उल्लंघन मानले जाते. असे करून तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन करता.