शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 16:58 IST
1 / 7ज्यामध्ये इंद्राणीची मुलगी शीना बोरा ही हयात असल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.2 / 710 वर्षांपूर्वी 2012 मध्ये शीना बोराची हत्या झाली होती आणि सीबीआय या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे.3 / 7मात्र, काही दिवसांपूर्वी शीनाची आई आणि आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने आपली मुलगी जिवंत असून ती काश्मीरमध्ये राहत असल्याचा दावा केला होता.4 / 7सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (सीबीआय) नुसार, 24 एप्रिल 2012 रोजी इंद्राणी मुखर्जी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि श्यामवर राय यांनी शीना बोराचा गळा दाबून खून केला होता. यानंतर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील गागोडे गावाजवळील जंगलात शीनाचा मृतदेह फेकून दिला.5 / 7इंद्राणी मुखर्जीने आपली मुलगी जिवंत असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली होती, परंतु चौकशीच्या मागणीसाठी तिच्या याचिकेवर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने इंद्राणीने विशेष न्यायालयात धाव घेतली होती.6 / 749 वर्षीय इंद्राणी मुखर्जीने 25 नोव्हेंबर रोजी भायखळा तुरुंगात एका कैद्याला भेटल्याचा दावा केला होता. मुखर्जीच्या म्हणण्यानुसार, खंडणीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर भायखळा तुरुंगात बंद असलेल्या आशा कोरकेने दावा केला की, गेल्या वर्षी 21 जून रोजी ती श्रीनगरमधील डल तलावाजवळ शीनाला भेटली होती.7 / 7इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाने असेही सांगितले की, संबंधित महिला तिचे म्हणणे नोंदवण्यास तयार आहे. इंद्राणी मुखर्जीसह अन्य तिघांवर शीना बोराच्या हत्येचा आरोप आहे.