japanese woman hide mothers body for 10 years in fridge
...म्हणून तिनं आईचा मृतदेह तब्बल १० वर्षे घरातल्या फ्रिजमध्ये ठेवला By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 5:27 PM1 / 8आई आणि लेकराच्या नात्याची तुलता जगात कशासोबतही होऊ शकत नाही. आपलं मूल कसंही असलं तरी आई त्याच्यावर जीवापाड प्रेम करतं.2 / 8आई दिसली नाही की मूल सैरभैर होतं. कारण हे नातं जगावेगळं असतं. मात्र जपानमध्ये एक भलतीच घटना घडली आहे. हा प्रकार पाहून अनेकांना धक्का बसला आहे.3 / 8जपानमध्ये एका महिलेने तिच्या आईचा मृतदेह १० वर्षांपासून फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. आईला मिळालेल्या सदनिकेत आरामात राहावं यासाठी आपण हे कृत्य केल्याचं महिलेनं सांगितलं.4 / 8आपल्याला कोणी घराबाहेर काढू नये. आईला मिळालेल्या घरात आपल्याला राहता यावं यासाठी आपण आईचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवल्याचं महिलेनं सांगितलं.5 / 8आईचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवणाऱ्या महिलेचं नाव योशिनो आहे. तिनं तब्बल १० वर्षांपासून आईचा मृतदेह लपवून ठेवला होता.6 / 8योशिनोच्या आईला ठराविक कालावधीसाठी सदनिका देण्यात आली होती. हा कालावधी संपल्यानं नगर पालिकेचं पथक घर रिकामं करण्यासाठी पोहोचलं. त्यावेळी ही बाब उघडकीस आली.7 / 8आईचं निधन झालं त्यावेळी योशिनोचं वय ६० वर्षे होतं. योशिनो यांनी आईचा मृतदेह लपवून ठेवल्याचं लक्षात येताच परिसरात खळबळ माजली.8 / 8योशिनो यांच्या आईच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेमुळे सगळेच चक्रावून गेले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications