Kinnar Ekta Joshi murder case many information came out from Delhi
दिल्लीत कोट्यवधींचा बंगला...लक्झरी कार्स, तृतीयपंथीयाच्या हत्येनंतर धक्कादायक खुलासे! By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 10:40 AM1 / 14दिल्लीच्या स्पेशल सेलने बक्षीस असलेल्या कॉन्ट्रॅक्ट किलरला अटक करून नॉर्थ ईस्ट दिल्लीमध्ये झालेल्या एका तृतीयपंथाच्या हत्येचा खुलासा केला. वर्चस्वाच्या लढाईत या हत्येसाठी ५५ लाख रूपयांची सुपारी देण्यात आली होती. यादरम्यान अनेक आश्चर्यजनक खुलासे झाले आहेत. ज्यात समोर आले की, कोट्यावधी रूपयांचा वाडा कसा बनवला. 2 / 14दिल्लीमध्ये गेल्यावर्षी तृतीयपंथी एकता जोशीची हत्या करण्यात आली होती. एकता तृतीयपंथीयांच्या गुरूची उत्तराधिकारी मानली जात होती. पण त्याआधीच एकताची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. ज्यांची चौकशी केल्यावर अनेक खुलासे झाले. पोलिसांना कळाले की, तृतीयपंथीयांच्या एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपच्या तृतीयपंथींच्या हत्येचा प्लॅन केला होता.3 / 14याच वर्चस्वाच्या लढाई अशीही माहिती समोर आली की, कशाप्रकारे तृतीयपंथीयांमध्ये वर्चस्व आणि पैशांच्या कलेक्शनवरून वाद सुरू होते. यामुळेच एका ग्रुपने दुसऱ्या ग्रुपमधील मुख्य एकताची हत्या केली.4 / 14जीटीबी इन्क्लेवमध्ये कमीत कमी १० कोटी रूपयांच्या बंगल्यात एकता जोशी राहत होती. याच एकताची गोळी झाडून ५ सप्टेंबरला हत्या करण्यात आली होती. या बंगल्यात तामिलनाडू, केरळ, उत्तर प्रदेशसहीत अनेक राज्यातून आलेले तृतीयपंथी राहत होते.5 / 14सध्या तृतीयपंथीयांची गुरू अनीता जोशी या बंगल्याची मालक आहे तर येणाऱ्या दिवसात एकता जोशी तृतीयपंथीयांची गुरू होणार होती. अनीताकडे यमुनानगर भागातील तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या पैशांच्या कलेक्शनचा ठेका आहे. कुठे कोण जाणार हे अनीता आणि एकता ठरवत होती.6 / 14या बंगल्या बाहेर अनेक लक्झरी कार दिसल्या. अनीता फॉच्यूनर कार चालवते आणि तिच्यासोबत शस्त्र असलेले प्रायव्हेट गार्डही असतात. बंगल्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावले आहेत.7 / 14घराबाहेर दोन लक्झरी कार आहेत. हत्येच्या दिवशी याच लाल रंगाच्या क्रेटामध्ये एकता आणि अनीता जीटीबी इन्क्लेवमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा एकताची स्कूटीवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी हत्या केली. 8 / 14घटनेच्या दिवशी एकतासोबत असलेल्या अनीताने सांगितले की, आम्ही लक्ष्मीनगरहून परत बंगल्यावर पोहोचलो होतो. तेव्हाच स्कूटीवरून आलेल्या लोकांनी एकतावर गोळी झाडली. त्यांना माझ्यावरही हल्ला करायचा होता. पण एकताने वाचवलं.9 / 14आजतकसोबत बोलताना चाहता नावाच्या एका तृतीयपंथीने सांगितले की, आमच्या समाजात फार जास्त स्पर्धा आहे. एकता चांगली बोलत होती. त्यामुळे ती लवकर प्रसिद्ध झाली.. त्यामुळे आरोपी तृतीयपंथी सिमरन, कोमल आणि वर्षा एकताचा राग करत होत्या. त्यामुळे त्यांनी ५५ लाखाची सुपारी देऊन हत्या केली.10 / 14तिने सांगितले की, आमचे विभाग ठरलेले असतात. आमचे गुरू ठरवतात की कोणत्या भागात कोण जाणार. कोण पैसे कलेक्शन करणार. एकताला तृतीयपंथीयांच्या मुख्य व्यक्तीचा दर्जा मिळाला होता. हे इतरांना सहन झालं नाही. 11 / 14एकतासोबतची तृतीयपंथी संजनाने सांगितले की, एकताचा दबदबा वाढत होता. तिचं नाव वाढत होतं. त्यामुळे दुसऱ्या ग्रुपचे तृतीयपंथी कोमल, वर्षा आणि सिमरनला राग येत होता. त्यांनी सुपारी दिली. हा परिसराचा वाद होता. 12 / 14चाहताने सांगितले की, आता आम्हाला भीती वाटत आहे. आरोपींना फाशी झाली पाहिजे. आम्हाला भीती आहे की, कुणी आरोपी सुटला तर तो आमच्यावर हल्ला करेल. एका दुसऱ्या तृतीयपंथीने सांगितले की, हे पूर्वीपासून चालत आलं आहे. आमचे गुरू सांगतात की, आपला परिसर कोणता आहे. आज आमच्यातच खूप स्पर्धा वाढली आहे.13 / 14एका तृतीयपंथीयाने सांगितले की, केवळ दिल्लीतच कोट्यावधींची कमाई आहे. सर्वांना विभाग वाटून दिले आहेत. कुणीही भाग सोडून दुसरीकडे जात नाही. 14 / 14अटक करण्यात आलेल्या गगन पंडीतने चौकशीत सांगितले की, एकता जोशीच्या हत्येसाठी ५५ लाखांची सुपारी मिळाली होती. हत्याकांडात सात लोक होते. गगनने सांगितले की, तो या हत्येचा मास्टरमाइंड होता. गगननुसार, तृतीयपंथीयांच्या एका गृपच्या सदस्याने गगनला संपर्क केला होता. त्याने एकता जोशी आणि तिच्या सावत्र आईची हत्या करण्यास सांगितले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications