शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वत:च्या होणाऱ्या पतीला अटक करून मिळवली शाबासकी, आता स्वत:च तुरुंगात गेली, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 20:49 IST

1 / 5
आरोप टाळण्यासाठी आणि आपली प्रतिमा उजळण्यासाठी जुनमणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला एफआयआर नोंदवून फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. मात्र संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी जुनमणी राभाला अटक केली.
2 / 5
जुनमणी राभा ही नागाव जिल्ह्यात उपनिरीक्षक म्हणून तैनात होती. नोकरीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राभाने तिचा होणारा पती राणा पराग याला अटक केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. आरोपी राणा पराग याने ओएनजीसीमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना फसवले होते असा आरोप होता.
3 / 5
पोलिसांनी सांगितले की, त्यांनी उपनिरीक्षक जुनमणी राभा यांच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरातून 11 बनावट सील आणि ओळखपत्रांसह अनेक गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात राभाच्या गुंत्यानंतर तिची कोठडीत चौकशी करण्यात आली आणि नंतर तिला अटक करण्यात आली.
4 / 5
पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान जुनमणी राभाच्या बँक खात्यात 20 लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली होती. ही रक्कम अज्ञातांनी जमा केली असून जुनमणी राभा यांना हिशेब देता आला नाही आणि फसवणुकीच्या या प्रकरणात अडकली.
5 / 5
उपनिरीक्षक जुनमणी राभासह तिचा होणारा नवरा पराग लोकांना नोकरीच्या नावाखाली फसवत असे, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पण हे प्रकरण उघडकीस येईल या भीतीने जुनमणीने तिच्या होणाऱ्या पतीस अटक केली जेणेकरून आपला सहभाग उघडकीस येऊ नये. मात्र आता आसाम पोलिसांनी राभाला अटक करून चौकशी सुरू केली आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAssamआसामArrestअटकfraudधोकेबाजीjobनोकरी