शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 4:31 PM

1 / 11
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ७०० हून अधिक सदस्य असल्याचा दावा करणारी ही गँग जुन्या शत्रूंच्या विरोधात तर सक्रिय आहेच पण आता त्यात नवीन नावंही येऊ लागली आहेत.
2 / 11
बिश्नोई गँगच्या शत्रूंच्या यादीत अभिनेता सलमान खानचं नाव नेहमीच टॉपवर आलं आहे. काळवीट शिकार प्रकरणामुळे हे वैर आणखी वाढलं. बिश्नोई गँगसाठी हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा राहिला.
3 / 11
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत अनेकांची नावं समोर आली आहेत. लॉरेन्सच्या आतापर्यंतच्या हिटलिस्टमध्ये कोण-कोणती नावं आहेत ते जाणून घेऊया....
4 / 11
बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे देखील बिश्नोई गँगच्या निशाण्यावर होते. गँगमधील काही गुन्हेगारांनी झिशान यांना टार्गेट केल्याची कबुली दिली आहे, मात्र त्याआधी वडिलांची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली.
5 / 11
कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा देखील लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये आहे. मुनव्वरने त्यांच्या एका शोमध्ये हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याचा आरोप होता, त्यानंतर त्याला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
6 / 11
या धमकीनंतर मुनव्वर फारुकीने आपली सुरक्षा वाढवली असून आता तो सार्वजनिक ठिकाणी कडक सुरक्षेखाली दिसत आहे. त्याच्याबाबत बरीच चर्चा रंगली होती.
7 / 11
पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या मॅनेजरचं नावही बिश्नोई गँगशी जोडलं गेलं होतं. असा दावा केला जात होता की, शगुनने बिश्नोई गँगचा जवळचा सहकारी असलेल्या विक्की मिड्डूखेडाच्या मारेकऱ्यांना आश्रय दिला होता.
8 / 11
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये आता आणखी एका नावाची भर पडली आहे. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावालाचं नाव समोर आलं आहे.
9 / 11
मिळालेल्या माहितीनुसार, तिहार जेलमध्ये बंद असलेल्या आफताबला गँगकडून धमक्याही येत आहेत. गेल्या महिन्यात एका मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, त्याला बिश्नोई गँगपासून धोका आहे.
10 / 11
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टमध्ये सातत्याने नवनवीन नावं जोडली जात आहेत. विनोदवीरांपासून ते राजकीय नेते आणि गुन्हेगारांपर्यंत गँगचं नेटवर्क दिवसेंदिवस विस्तारत आहे.
11 / 11
गँगच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवणं आता सुरक्षा यंत्रणांसाठी अधिक महत्त्वाचं झालं आहे कारण ही गँग आता केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही सक्रिय झाली आहे.
टॅग्स :Baba Siddiqueबाबा सिद्दिकीCrime Newsगुन्हेगारीSalman Khanसलमान खानShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर