शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रेमाला धर्म नसतो! धर्माच्या बेड्या झुगारून डॅडीने झुबेदा मुजावर यांच्यासोबत केलं होतं लग्न

By पूनम अपराज | Published: February 09, 2022 1:58 PM

1 / 11
भायखळा येथील डॅडीची दगडी चाळ म्हणून ओळखली जाते. अरुण गवळीने १९७० आणि १९८० च्या दशकामध्ये याच दगडी चाळीतून आपली गवळी गँग चालवली. त्या काळात अरुण गवळीच्या नावापेक्षा दगडी चाळची दहशत मोठी होती. (Photo Credit - Facebook and Instagram)
2 / 11
अरुण गवळी 1980 मध्ये राम नाईकच्या गॅंगमध्ये सहगाभी झाला. यादरम्यान त्याची दाऊद आणि छोटा राजनसोबत मैत्री झाली. तो त्यांच्यासाठी काम करू लागला. यादरम्यान अरुण गवळीच्या भावाची गॅंगवारमध्ये हत्या करण्‍यात आली. गवळीने स्वत:ची गॅंग बनवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने दाऊद-गवळीमध्ये शत्रुत्त्व निर्माण झाले होते. दरम्यान अरुण गवळी यांच्या आयुष्यात आली होती एक तरुणी
3 / 11
तिचं नाव आहे झुबेदा मुजावर. अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, डॅडीला मम्मीचा साधेपणा आवडला आणि त्यांनी लगीनगाठ बांधली. माझी मम्मी तिच्या दादीकडे बहिणींसोबत दगडी चाळीजवळ कामानिमित्त येत असे. त्यावेळी डॅडीला मम्मी आवडली. मुळात तिच्यातील साधेपणा डॅडीला भावला. त्यामुळे प्रेमाला धर्म नसतो हे डॅडीने दाखवून दिले असे गीता गवळी म्हणाल्या. 
4 / 11
झुबेदा मुजावर यांनी डॅडीसोबत लग्न केल्यानंतर आशा गवळी बनल्या. धर्माच्या बेड्या जुगारून अरुण गवळीने झुबेदाशी लगीन गाठ बांधली आणि दगडी चाळीतील आशा गवळी म्हणजे “मम्मी” म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
5 / 11
आशा गवळी हिने अरुण गवळीचा अखिल भारतीय सेना हा पक्ष उभा करण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत अरुण गवळीला खूप मोठा पाठिंबा दिला.
6 / 11
काही काळानंतर भायखळ्यात राहणारी झुबेदा मुजावर यांच्यासोबत अरुण गवळी यांचे प्रेमसंबंध जुळत गेले आणि डॅडी तिच्या प्रे’मात वेडा झाला. यानंतर झुबेदाचा तिच्या धर्मातील मुलासोबत विवाह ठरला आणि याबाबत डॅडीने सर्व हकीकत त्याच्या मित्रांना सांगितली. डॅडीने झुबेदाला लग्नासाठी विचारले आणि तिने होकारसुद्धा दिला.
7 / 11
यानंतर अरुण आणि जुबेदा यांनी विवाह केला आणि तिला आपल्यासोबत राहण्यास आणले. याचसोबत अरुण गवळीने झुबेदाचे नाव बदलून आशा गवळी ठेवले. कपाळावर मोठं कुंकू आणि गळयात मोठे मंगळसूत्र घालणाऱ्या आशा गवळीकडे बघून कोणाचाही विश्वास बसणार नाही की ती जन्माने मुस्लिम आहे. पण तिने देखील धर्माच्या बेड्या झिडकारून डॅडीला आपलंस केलं. 
8 / 11
अरुण गवळी आणि आशा गवळी यांना पाच मुले झाली आणि गीता, महेश, योगेश, योगिता, आणि अस्मिता अशी त्यांची नावं आहेत.
9 / 11
अरुण गवळीच्या राजकीय कारकिर्दीत पत्नी आशा गवळी हिचा मोलाचा सहभाग होता. गल्लो गल्ली आशा गवळीने प्रचारासाठी जोडे झिजवले. त्यानंतर डॅडी आमदार म्हणून निवडून आला.
10 / 11
लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी दगडी चाळीत अरुण गवळी आणि त्याची पत्नी आशा गवळी यांनी मदतीचा हात दिला.
11 / 11
एप्रिल २०२० मध्ये नागपूर कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेला कुख्यात डॉन अरुण गवळी याने लॉकडाऊनच्या काळात दगडी चाळीत गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला होता. भायखळा परिसरात अरुण गवळी यांचे निवासस्थान असलेल्या दगडी चाळीत अनेक कुटुंबांना त्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते.
टॅग्स :Arun Gawliअरुण गवळीmarriageलग्न