शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धक्कादायक! प्रेयसीने प्रियकराला दिली गूड न्यूज, त्याने रागाच्या भरात गर्भवतीच्या मानेवर चाकूने केले वार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 12:46 PM

1 / 10
झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील हुसैनाबाद पोलीस स्टेशन परिसरातील बडेपूर गावच्या बालूघाटमध्ये एका अल्पवयीन मुलीच्या हत्याकांडाबाबत पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. या हत्याकांडातील आरोपी अल्पवयीन मुलीच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.
2 / 10
तपासातून समोर आले की, अल्पवयीन मुलीचं आधीच एका दुसऱ्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. या मुलासोबत मुलगी नेहमी फोनवर बोलत होती.
3 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, दोघांकडेही आपले स्वत:चे फोन नव्हते. त्यामुळे मुलगा त्याच्या एका मित्राच्या फोनवरून आणि मुलगी तिच्या वडिलांच्या तर कधी भावाच्या फोनवरून बोलत होती.
4 / 10
यादरम्यान मुलगा नोकरीसाठी गुजरातला गेला. त्यामुळे दोघांचा संपर्क कमी झाला. यानंतर मुलगी आपल्या प्रियकराच्या मित्राला फोन करत होती आणि प्रियकर कसा आहे हे विचारत होती.
5 / 10
अशात प्रियकराचा मित्र नीरज सिंहसोबत अल्पवयीन मुलगी फोनवर बोलू लागली. हळूहळू त्यांची मैत्री अधिक वाढली. मुलगी आता तिच्या प्रियकराच्या मित्रावर प्रेम करू लागली होती.
6 / 10
आता दोघे भेटूही लागले होते. अशात दोघांमद्ये शारीरिक संबंधही झाले. आणि मुलगी गर्भवती झाली. नीरज सिंहला समजलं की, मुलगी गर्भवती आहे तर तो तिला गावातील एका नर्सकडे घेऊन गेला. नर्सने गर्भपात करण्यासाठी १० हजार रूपये मागितले.
7 / 10
इतके पैसे नसल्याने तो प्रेयसीचा गर्भपात करू शकला नाही. त्यानंतर मुलगी तिच्या प्रियकराला ब्लॅकमेल करू लागली की, एकतर गर्भपात करून दे नाही तर माझ्याशी लग्न कर. यामुळे नीरज सिंह डिप्रेशनमध्ये आला. त्याने एका दुसऱ्या मित्रासोबत मिळून मुलीला संपवण्याचा प्लॅन केला.
8 / 10
अशात नीरज सिंहने मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलवलं आणि म्हणाला की, आपण दोघे पळून जाऊन लग्न करू. मुलगी सकाळी ४ वाजता प्रियकराला भेटायला पोहोचली. काही वेळ बसून दोघे एकमेकांशी बोलले.
9 / 10
मुलाने तिला मिठी मारली आणि तेव्हाच तिच्या मानेवर चाकूने वार केला. मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. नीरज सिंह आणि त्याचा मित्र ओमप्रकाश तिचा मृतदेह घेऊन बाइकवरून कोयल नदीजवळ आले. तिथे वाळूत तिचा मृतदेह पुरला.
10 / 10
ही घटना २१ फेब्रुवारीची आहे. त्यानंतर २७ फेब्रुवारीला पोलिसांनी तिचा मृतदेह वाळूतून बाहेर काढला. तिच्या शरीराचे लचके कुत्र्यांनीही तोडले होते. त्यानंतर कारवाई करत ६ मार्चला पोलिसांनी नीरज सिंह आणि त्याच्या मित्राला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मुलीचा जुना प्रियकर गुजरातमध्ये आहे आणि तो निर्दोष आहे. त्याच्या मित्रांना तुरूंगात पाठवण्यातत आलं आहे.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड