A lovers couple was walking in the forest outside the village, caught by the villagers and ...
गावाबाहेरील जंगलात फिरत होती प्रेमी जोडपी, ग्रामस्थांनी पकडले आणि... By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 8:55 AM1 / 6एकांताच्या शोधात जाणाऱ्या जोडप्यांशी गैरवर्तन होण्याचे प्रकार आपल्याकडे सातत्याने घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 2 / 6झारखंडमधील गढवा येथे एकत्र फिरत असलेल्या दोन प्रेमी युगुलांना मारहाण करण्यात आली. गावातील काही लोकांनी या जोडप्यांना गावालगतच्या जंगलात फिरताना पाहिले होते. त्यानंतर त्यांनी त्याच क्षणी या जोडप्यांना शिक्षा दिली. ग्रामस्थांनी आधी या तरुण तरुणींवर फटके मारले त्यानंतर त्यांना सगळ्यांसमोर उठाबशा काढायला लावल्या. 3 / 6ग्रामस्थांनी या युगुलांची चौकशी केली असता दोन्ही तरुण हे दंडई पोलीस ठाणे क्षेत्रातील असल्याचे समोर आले. तर दोन्ही तरुणी ह्या मेराल पोलीस ठाणे क्षेत्रातील चामा गावातील असल्याचे उघड झाले. 4 / 6दरम्यान, आपले एकमेंकांवर प्रेम असल्याचे या तरुण तरुणींनी सांगितले. मात्र तरीही ग्रामस्थांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. तसेच ग्रामस्थांनी त्यांना एकमेकांसमोर अपमानीत करून मारहाण केली. 5 / 6त्यानंतर ग्रामस्थांनी याची माहिती या तरुण, तरुणींच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर या तरुण तरुणींनी कुटुंबीयांच्या हवाली केले. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली नाही. गावामध्ये सध्या बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गावातील काही जण पहाऱ्यासाठी फिरत आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला. 6 / 6काही दिवसांपूर्वी याच जंगलाच्या परिसरामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यामध्ये एका तरुणीने आत्महत्या केली होती. तेव्हापासून पुन्हा अशी घटना होऊ नये यासाठी ग्रामस्थच स्वत: गावातील हालचालींवर लक्ष देत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications