शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

प्रियाचं 'ते' पत्र, क्रिकेटपटूचा उल्लेख अन् मर्डर मिस्ट्री...आत्महत्या मानण्यास का तयार नाहीत वडील? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 8:27 AM

1 / 10
लखनौच्या एसआर ग्लोबल कॉलेजची विद्यार्थिनी प्रिया राठोड हिच्या मृत्यूचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुतींचा विषय ठरत आहे. याप्रकरणात दर दिवशी एकामागोमाग एक धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या डेथ मिस्ट्रीची नवी बाजू समोर आली आहे.
2 / 10
प्रियानं लिहिलेल्या चिठ्ठीवरुन नवी माहिती समोर आली आहे. पोलिसांना जी चिठ्ठी सापडली आहे ती प्रियानं तिच्या मृत्यूपूर्वी काही दिवसांपासून लिहिली होती. ही चिठ्ठी एका क्रिकेटपटूसाठी लिहिली गेली आहे. आता क्रिकेटपटूचा जबाबच याप्रकरणात प्रियाची हत्या झालीय की ती एका अपघाताला बळी पडली आहे ते समजू शकणार आहे.
3 / 10
पोलिसांना याआधी प्रियाची एक डायरी मिळाली होती. ज्यात तिनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी नमूद करुन ठेवल्या होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार पोलिसांना याच डायरीमधून एक पान असं सापडलं आहे की ज्यातील उल्लेखानं याप्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या उल्लेखामुळे संबंधित प्रकरण आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
4 / 10
आता पोलिसांना सापडलेलं ते पान आणि त्यातील मजकूर कितपत खरा आहे याची तपासणी केली जात आहे. फॉरेन्सिंग तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. संबंधित पानावर नेमकं प्रियानं काय लिहिलं आहे याचा खुलासा पोलिसांनी अद्याप केलेला नाही.
5 / 10
मिळालेल्या माहितीनुसार जालौन येथील रहिवासी असलेली १३ वर्षीय प्रिया राठोड एसआर ग्लोबल कॉलेजमध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थिनी होती. २० जानेवारी रोजी हॉस्टेलच्या बिल्डिंगवरुन संशयास्पद परिस्थितीत पडून तिचा मृत्यू झाला होता. बीकेटी ठाण्यात प्रियाचा वडिलांनी जबरदस्तीनं हत्या प्रकरणाची नोंद करायला लावली. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
6 / 10
पोलिसांनी जी चिठ्ठी सापडली आहे ती प्रियानं ५ डिसेंबर रोजी लिहिली होती. यात चिठ्ठीत तिनं ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख केला आहे तो खलीलाबाद येथील रहिवासी आहे. पण प्रियानं त्याचं नाव चिठ्ठीत लिहिलेलं नाही. पण तिनं चिठ्ठीत केलेल्या उल्लेखानुसार संबंधित क्रिकेटपटू सामना खेळण्यासाठी काश्मीरला गेला होता हे निष्पन्न होत आहे.
7 / 10
'तुझी कॉपी माझ्याकडे आहे. ती मी दिव्यांशीकडे पाठवून देईन. काश्मीरवरुन मला नक्की काहीतरी घेऊन ये. घरी पोहोचलास की स्नॅपचॅटवर रिक्वेस्ट पाठवेन. रिप्लाय नक्की कर आणि जर नाही केलास तर खूप मार खाशील. तुझी लंगोटिया यार, जिगरी दोस्त, दुश्मन प्रिया राठोड', असं प्रियानं चिठ्ठीत नमूद केलं आहे.
8 / 10
५ डिसेंबर रोजी लिहिल्या गेलेल्या या पत्रात प्रियानं आपण आजारी असून रुग्णालयात दाखल असल्याचं ती सांगू पाहात होती. पण तिच्या वडिलांच्या सांगण्यानुसार ५ डिसेंबर रोजी प्रियाची तब्येत ठीक नव्हती आणि तिला घरी परत नेण्यासाठी ते लखौनाला गेले होते. तिथून तिला जालौन येथे आपल्या राहत्या घरी तिला घेऊन आले होते. घरी आल्यानंतर वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेलं असता काही औषधं देऊन डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं होतं. मग असं असताना प्रिया तिच्या मित्राला आपण रुग्णालयात दाखल असल्याचं का म्हणत होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
9 / 10
प्रियाच्या वडिलांनी तर आता पोलिसांवरच आरोप केला आहे. मुलीच्या हत्याप्रकरणाला आत्महत्येत बदलण्यासाठी पोलिसच आता अशी पत्र स्वत: लिहून मीडियापर्यंत पोहोचवली जात आहेत, असं प्रियाच्या वडिलांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रियानं ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
10 / 10
संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात असल्याचंही पोलीस म्हणाले. सर्व बाजूनं तपासणी होत असून सर्व पुरावे गोळा केले गेले आहेत आणि त्याची तपासणी सुरू असल्याचं डीसीपी नॉर्थ झोन कासिम अब्दी यांनी सांगितलं.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी