Madhya Pradesh Indore married woman murder accused husband police officer brother in law arrested
पूजा हत्याकांड केसमध्ये धक्कादायक खुलासा, पोलीस अधिकारी पती अन् दोन दिरांनीच केली हत्या! By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 10:01 AM1 / 12मध्य प्रदेशच्या इंदुर (Indore Crime) पोलिसांनी एका हत्येचा छडा लावला आहे. पूजा हत्याकांडातील (Pooja Murder Case Indore ) गुन्हेगार दुसरं कुणी नसून पूजाचा पोलीस अधिकारी पती आणि त्याचे दोन भाऊ आहेत. पूजाचा पती ३४व्या बटालियन कंपनीचा कमांडर आहे. तर तिचा एक दीर पोलीस आहे. तो छिंदवाडा येथे तैनात आहे. 2 / 12महिलेच्या पतीने त्याच्या दोन भावांसोबत मिळून आपल्या पत्नीची हत्या केली. असं असलं तरी तो सुरूवातीपासून स्वत:ला निर्दोष सांगत होता. मात्र, नंतर या खूनाचा पोलिसांनी खुलासा केला.3 / 12ही खळबळजनक घटना इंदुरच्या मल्हारगंज पोलीस स्टेशन परिसरात घडली होती. येथील कमला नेहरू कॉलनीतील रामदुलारी अपार्टमेंटमध्ये गेल्या शनिवारी पूजा उर्फ जान्हवीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 4 / 12पूजाचा पती स्वत:ला निर्दोष सांगत होता. पोलिसांनुसार मृत महिला आऱोपी पोलीस अधिकाऱ्याची दुसरी पत्नी होती. यावरूनत त्यांच्या घरात काही दिवसांपासून वाद सुरू होते.5 / 12कोरोना काळात एकच खळबळ उडवून देणाऱ्या या हत्याकांडाचा तपास मल्हारगंज पोलीस करत होते. ही घटना कोणत्या हाय प्रोफाइल घटनेपेक्षा कमी नव्हती. पोलिसांनी आधीच संशयावरून मृत महिलेच्या दोन्ही दिरांना अटक केली होती. 6 / 12तर पूजाचा पती जितेंद्र अस्के तो निर्दोष असल्याचं सांगत होता. मात्र, पोलिसांचा तपास सुरू होता. पोलिसांनी जेव्हा महिलेच्या दिरांची कसून चौकशी केली. तेव्हा सगळा खुलासा झाला. पोलिसांना समजलं की, या हत्येचा पूर्ण प्लॅन तिच्या पतीने केला होता. त्याला या हत्याकांडाची माहिती होती.7 / 12३४व्या बटालियनमध्ये कंपनी कमांडर पदावर असलेला जितेंद्र अस्के याने दोन लग्ने केली होती. त्याचं पहिलं लग्न धारच्या अन्नू सोबत झालं होतं. या पत्नीपासून त्याला मुलंही आहेत. 8 / 12तेच त्याने इंदुरमध्ये दुसरं लग्न पूजा ऊर्फ जान्हवीसोबत केलं होतं. पूजाला जेव्हा याबाबत समजलं तर तिने थेट पतीच्या पहिल्या पत्नीला म्हणूजे अन्नूला फोन लावला आणि तिच्यासोबत भांडण केलं.9 / 12त्यानंतर पहिली पत्नी अन्नूने जितेंद्रला मुलांसहीत आत्महत्या करेन अशी धमकी दिली. वैतागलेला जितेंद्र धारला पोहोचला. धारमध्ये आधीच जितेंद्रचा भाऊ राहुल हजर होता. तो छिंदवाडात तैनात आहे. 10 / 12तसेच त्याच्या मावशीचा मुलगा नवीनही तिथे होता. इथेच तिघांनी पूजाला संपवण्याचा प्लॅन केला. यानंतर दोघेही दीर राहुल आणि नवीन इंदुरला पोहोचले. त्यांनी शनिवारी रात्री ८ वाजता ८ महिन्याची गर्भवती असलेल्या पूजाची गळा दाबून हत्या केली. 11 / 12पूजाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी जितेंद्रवर गंभीर आरोप लावले. पोलिसांनी राहुल आणि नवीनला अटक केली. तर जितेंद्र पोलिसांना सांगत राहिला की, त्याला याबाबत काहीच माहीत नाही. मात्र, चौकशी दरम्यान राहुल आणि नवीन यांनी सगळा खुलासा केला. अशाप्रकारे या हत्याकांडाची माहिती समोर आली. पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे. 12 / 12पूजाच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी जितेंद्रवर गंभीर आरोप लावले. पोलिसांनी राहुल आणि नवीनला अटक केली. तर जितेंद्र पोलिसांना सांगत राहिला की, त्याला याबाबत काहीच माहीत नाही. मात्र, चौकशी दरम्यान राहुल आणि नवीन यांनी सगळा खुलासा केला. अशाप्रकारे या हत्याकांडाची माहिती समोर आली. पोलिसांनी जितेंद्रला अटक केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications