शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दोन मुलांच्या वडिलाने फेसबुकवर तरूणीसोबत केली मैत्री, गर्भवती झाल्यावर तिला सोडून फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 5:45 PM

1 / 7
आजच्या या धावपळीच्या जीवनात एकटे लोक सोशल मीडियावर पार्टनर शोधतात आणि त्यांच्यासोबत मैत्री करतात. मात्र, आसामच्या एक महिलेला फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करणं आणि त्या व्यक्तीच्या प्रेमात पडणं चांगलंच महागात पडलं आहे. तरूणी गर्भवती राहिल्यावर पुरूषाने तिला सोडलं. आता न्यायासाठी तरूणी धडपडत आहे.
2 / 7
ही घटना आहे उत्तर प्रेदशातील रामपूरची. फेसबुकवर एक विवाहित तरूण तकमील अहमदने आसामची राहणाऱ्या एका तरूणीसोबत मैत्री केली. लवकरच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि महिला आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी चंडीगढला गेली. तरूण चंडीगढमध्ये हेअरकटिंगचं काम करत होता.
3 / 7
आसामची तरूणी चंडीगढला पोहोचून तरूणासोबत राहू लागली आणि यादरम्यान ती गर्भवती झाली. तिला याचा जराही अंदाज नव्हता की, तिचा प्रियकर आधीच विवाहित आहे. अशात तरूणी गर्भवती झाल्यावर प्रियकराने तिला काहीबाही सांगून आसामला परत पाठवलं.
4 / 7
यानंतर प्रियकराने आपला मोबाइल फोन बंद केला आणि यादरम्यान तरूणीने एका बाळाला जन्मही दिला. ९ महिन्यांपासून आपल्या प्रियकराचा शोध घेत असलेली तरूणी पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या रामपूरच्या टांडा गावात प्रियकर तकमील अहमदच्या घरी पोहोचली. जेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली तेव्हा त्याला दोन मुले आणि पत्नीसोबत बघून हैराण झाली.
5 / 7
रामपूरला पोहोचलेली तरूणी वन स्टॉप सेंटरच्या मदतीने आपल्या प्रियकरापर्यंत पोहोचली होती. वन स्टॉप सेंटरने तिच्या प्रियकराला शोधून काढलं. प्रियकर तरूण, त्याची पत्नी आणि दोन्ही मुलांचं वन स्टॉप सेंटरला आणून काउन्सेलिंगही करण्यात आलं. आसामची राहणारी त्याची प्रेयसी तरूणासोबत राहण्यास तयार होती. पण त्याची पत्नी तयार नव्हती.
6 / 7
तरूणाने सांगितलं की फेसबुकच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली होती. लवकरच ही मैत्री प्रेमात बदलली आणि तरूणाने बोलवल्यावर ती चंडीगढला पोहोचली होती. त्यानंतर दोघे सोबत राहत होते. महिलेनुसार, तिला तिच्या प्रियकराने त्याच्या लग्नाबाबत काहीच सांगितलं नव्हतं.
7 / 7
जिल्हा प्रोबेशन अधिकारी पल्लवी सिंह म्हणाल्या की, या संपूर्ण प्रकरणाची सुरूवात चंडीगढवरून झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला तरूणाने चंडीगढला बोलवलं होतं. चंडीगढला आल्यावर ही महिला आरोपीकडून प्रेग्नेंट झाली होती. आरोपी लग्नाचं आमिष देत राहिला. महिला प्रेग्नेंट झाल्यावर आसामला गेली.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी