Mansukh Hiren Case: NIA seeks one month to file chargesheet
Mansukh Hiren Case : दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएने मागितली एक महिन्याची मुदत By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 9:11 PM1 / 6निलंबित पोलीस अधिकारी सचिन वझे, रियाझुउद्दीन सिद्दीकी आणि सुनील माने यांनी तपास यंत्रणा तपास सुरू झाल्यानंतर ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करू न शकल्याने आपल्याला आपोआप जामीन मिळावा, यासाठी विशेष न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मगण्याकरिता न्यायालयात अर्ज केला.2 / 6९ जून रोजी विशेष न्यायाधीश प्रशांत सिंत्रे यांनी एनआयएला दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ दिली होती. 3 / 6 दरम्यान, एनआयएने न्यायालयाला सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या मुदतीत तपास यंत्रणेने पुढे तपास करत पाच जणांना ताब्यात घेतले.4 / 6त्यांच्याकडून मिळालेल्या कागपत्रांचे विश्लेषण करून अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेली मुदतवाढ पुरेशी नाही. त्यामुळे आणखी ३० दिवस वाढवून द्यावेत.5 / 6अंटालिया स्फोटके प्रकरणी तोंड बंद ठेवण्यासाठी मनसुख हिरेन याची हत्या करण्याकरिता आरोपींना ४५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला आहे. 6 / 6सराईत गुन्हेगारांना सुपारी देऊन हिरेन यांची हत्या घडवून आणली गेली, असा खळबळजनक खुलासा एनआयएनं केला आहे. हिरेन यांना मारण्यासाठी ४५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचं एनआयएनं सांगितलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications