शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नादिवशीच प्रियकरासोबत पळून गेली वधू, पोलीस ठाण्यात म्हणाली, 'आम्हाला तुरूंगात ठेवा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 1:09 PM

1 / 10
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे एक वधू तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली. मंडपात लग्नसमारंभातील सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, जेव्हा वधूच्या कुटुंबीयांना ती पळून गेल्याची माहिती मिळाली, तेव्हा कुंटुबातील मंडळी तिचा शोध घेत प्रियकराच्या घरी गेले.
2 / 10
मात्र, वधू आणि तिचा प्रियकरही तेथून पळून गेले होते. यावेळी वधू आणि तिच्या प्रियकराच्या दोन कुटुंबात वाद झाला. यादरम्यान वधू आणि तिचा प्रियकर एसपी कार्यालयात पोहोचल्याची माहिती मिळाली, जिथे दोघांनीही आपल्या सुरक्षेची विनंती केली.
3 / 10
ग्वाल्हेरच्या हस्तिनापूर गावात राहणाऱ्या 20 वर्षांच्या मुलीचे शनिवारी लग्न होणार होते. पण या मुलीचे बिजौली पोलीस स्टेशन परिसरातील राधेश्याम या मुलासोबत प्रेमसंबंध होते. घरात लग्नाची तयारी चालू होती आणि मुलीच्या घरातील मंडळींना तिच्या प्रियकराशी असलेले नाते मान्य नव्हते.
4 / 10
मुलीचे शनिवारी हे लग्न होणार होते आणि घरी लग्नाचा मंडप देखील उभारला आला होता. परंतु सात फेऱ्यांपूर्वी मुलीने संधी पाहिली आणि तेथून पळून गेली. यादरम्यान तिचा प्रियकर राधेश्याम हा महामार्गावर वाट पाहत होता.
5 / 10
जेव्हा मुलीच्या घरच्यांनी ती पळून गेल्याचे ऐकले तेव्हा सर्वांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर कुटुंब हे तिच्या प्रियकराच्या घरी पोहोचले. यावेळी दोन्ही कुटुंबात वाद-विवाद झाले आणि मुलीच्या नातेवाईकांनी प्रियकराच्या कुटुंबीयांना धमकावले.
6 / 10
या मुलीचे कुटुंब घरी येऊ शकते याची कल्पना तिच्या प्रियकराला होती. त्यामुळे हे दोघेही तेथून पळून एसपी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपल्या सुरक्षेसाठी विनंती पोलिकांकडे केली.
7 / 10
घाबरलेल्या या दोघांनी पोलिसांसमोर आपली सुरक्षा करण्याची मागणी केली. तसेच, एकमेकांशिवाय आम्ही जगू शकत नाहीत आणि आम्हाला आठ दिवस तुरूंगात ठेवा, अशी विनंती या दोघांनी पोलिसांसमोर केली.
8 / 10
या प्रकरणात मुलीचे म्हणणे आहे की, 'तिचे शनिवारी लग्न होणार होते, परंतु तिला तिच्या प्रियकर सोबत राहायचे होते. त्यामुळे मी घरून संधी पाहून पळून गेले'.
9 / 10
तर प्रियकराने सांगितले की, मुलीचे कुटुंब हे माझे आणि माझ्या कुटुंबीयांच्या मागे पडले आहे. जर त्यांना मी सापडलो तर ते मला ठार मारतील. मात्र, मी प्रेमिकाशिवाय शिवाय जगू शकत नाही'.
10 / 10
दरम्यान, एसपीने या दोघांनाही महिला पोलिस ठाण्यात पाठवून या दोघांच्या कुटुंबीयांना माहिती दिली व समुपदेशन करण्यास सांगितले.
टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी