1 / 8मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक तपासणीत डॉक्टर महिलेने उडी मारल्याची बाब समोर आली आहे. त्याचवेळी डॉक्टरच्या पालकांनी खुनाचा आरोप केला आहे. सध्या पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.2 / 8मूळचे रायबरेली येथील रहिवासी असलेले डॉ. सुशील वर्मा आणि त्यांची पत्नी डॉ.मंजू यांना दीड वर्षाचा मुलगा रुद्रांश आहे. 3 / 8हे कुटुंब कानपूरमधील बिथूर थानपूर अंतर्गत सिंहपूरमधील रुद्र अपार्टमेंटमध्येटॉवर नंबर -५ च्या आठव्या मजल्यावरील फ्लॅट नंबर -८ ए मध्ये राहते.4 / 8डॉ. सुशील वर्मा जालौन मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. तर पत्नी मंजू यांनीही प्रयागराजमधील राणी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पूर्ण केले आहे. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आठव्या मजल्याच्या खाली पडल्यानंतर मंजूचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. तर सकाळी मंजूच्या माहेरची माणसं आली.5 / 8अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश पीआरओ अर्जुन प्रसाद म्हणाले की, जानेवारी २०१९ रोजी मुलगी मंजूचे डॉ. सुशील वर्माशी लग्न झाले होते. 6 / 8शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुशीलचा धाकटा भाऊ सुधीर यांनी फोन करून सांगितले की, वाहिनी बाल्कनीतून खाली पडली आहे. 7 / 8सकाळी जेव्हा आम्ही कुटुंबासमवेत आलो तेव्हा कळले की मंजूचे निधन झाले आहे. 8 / 8जावई सुशीलने सदनिका घेण्यासाठी ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते आणि मंजूवर माहेरहून हप्ते भरण्यासाठी पैसे मागण्यासाठीदबाव आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.