Mehul Choksi woman who came dominica not girlfriend but part of abduction team says sources
गर्लफ्रेन्ड म्हटल्या जाणाऱ्या महिलेनेच केल मेहुल चोकसीचं अपहरण? सीक्रेट ऑपरेशनमध्ये अडकला चोकसी! By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 1:49 PM1 / 12पंजाब नॅशनल बॅंक घोटाळ्यातील आरोपी उद्योगपती मेहुल चोकसी पकडला गेल्यावर हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मेहुल एका महिलेसोबत डोमिनिका येथे पोहोचला होता. तिथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.2 / 12मात्र, ज्या महिलेला त्याची गर्लफ्रेन्ड सांगितली जात होती ती महिला त्याची गर्लफ्रेन्डच नाहीये. इंडिया टुडेने चोकसीशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने याची माहिती दिली आहे. सूत्रांनी सांगितलं की, ती महिला त्याचं अपहरण करून अटक करणाऱ्या टीमचा एक भाग आहे. 3 / 12मेहुल चोकसी काही दिवसांपूर्वी एंटीगाहून अचानक गायब झाला होता आणि आता समोर आलं की, त्याला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे.4 / 12चोकसीच्या वकिलांनी दावा केला आहे की, २३ मे रोजी त्याचं अपहरण करण्यात आलं होतं आणि या लोकांचा भारताशी संबंध आहे. वकिलांचा आरोप आहे की, एंटीगाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून हे अपहरण करण्यात आलं. 5 / 12आरोप आहे की, चोकसीला मारलं गेलं आणि त्याला यातना देण्यात आल्या. त्यानंतर त्याला डोमिनिका येथे आणण्यात आलं. तिथे त्याला अटक केली. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, त्या महिलेने एंटीगामध्ये काही वेळ घालवला होता. ती रोज सकाळी आणि सायंकाळी फिरायला निघत असे. तेव्हाच तिची भेट चोकसीसोबत झाली आणि दोघांची मैत्री झाली.6 / 12नंतर याच महिलेने २३ मे रोजी त्याला आपल्या अपार्टमेंटमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं. चोकसी जसा तिथे पोहोचला कथितपणे तिथे त्याचं अपहरण करण्यात आलं. तेच त्याला डोमिनिकाला घेऊन आले.7 / 12रविवारी एंटीदा आणि बारबुदाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी संवेदनशील दावा करत सांगितले की, चोकीस आपल्या गर्लफ्रेन्डसोबत डोमिनिकाला गेला होता. पण तो पकडला गेला. 8 / 12ब्राउन यानी डोमिनिकाच्या प्रशासनाला विनंती केली आहे की, चोकसीला थेट भारतात पाठवलं जावं. अटकेनंतर मेहुल चोकसीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात तो तुरूंगात असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्याला डोळ्याला जखम असल्याचंही दिसत आहे.9 / 12वकिलांनी दावा केला आहे की, चोकसीला वाईटपणे मारण्यात आलं. सोमवारी चोकसीला एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या मेडिकल रिपोर्टनुसार, त्याची कोविड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पीएनबी घोटाळ्याबाबत सांगायचं तर चोकसीवर १३ हजार कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा आऱोप आहे.10 / 12तसेच त्याला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिका पोलिसांनी अटक केली होती. तो भारतातून पळून गेल्यावर एंटीगा येथे राहत होता. चोकसी हा नीरव मोदीचा मामा आहे. नीरव मोदीही भारत सोडून ब्रिटनमध्ये पळाला आहे. 11 / 12तसेच त्याला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिका पोलिसांनी अटक केली होती. तो भारतातून पळून गेल्यावर एंटीगा येथे राहत होता. चोकसी हा नीरव मोदीचा मामा आहे. नीरव मोदीही भारत सोडून ब्रिटनमध्ये पळाला आहे. 12 / 12तसेच त्याला बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी डोमिनिका पोलिसांनी अटक केली होती. तो भारतातून पळून गेल्यावर एंटीगा येथे राहत होता. चोकसी हा नीरव मोदीचा मामा आहे. नीरव मोदीही भारत सोडून ब्रिटनमध्ये पळाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications