शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Mehul Choksi’s girlfriend: मेहुल चोक्सीची 'ती' रहस्यमयी हॉट गर्लफ्रेंड कोण? समोर आले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 3:29 PM

1 / 11
अँटिगा आणि बार्बुडाचे पंतप्रधान गैस्टन ब्राऊन यांनी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) डॉमिनिकामध्ये गर्लफ्रेंडसोबत (girlfriend) मौजमजा करण्यास गेला होता, असा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या जगासाठी रहस्य बनलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो समोर आले आहेत. (Mehul Choksi living lavishly in Carribean nations went out to meet his ‘girlfriend’)
2 / 11
मेहुल चोक्सीला कॅरेबियन देश डॉमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. याचा खुलासा झाल्यानंतर मेहुल चोक्सीची ही गर्लफ्रेंड आहे तरी कोण, याबाबत भारतीयांना उत्सुकता लागून राहिली होती. (After Mehul was caught, his girlfriend Babra Zarabika has also gone missing.)
3 / 11
सध्या मेहुल चोक्सी हा डॉमिनिकामध्ये हॉस्पिटलाईज आहे, त्याला भारतात आणण्यासाठी एक खास विमान पाठविण्यात आले आहे. त्याची प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली आहे.
4 / 11
मेहुलला कॅरेबियन देश अँटिगा आणि बार्बुडामध्ये त्याची सो कॉल्ड गर्लफ्रेंड बबारा जराबिका (Babara Jarabica) सोबत अनेकदा पाहिले गेले होते. गेल्या रविवारी तो याच बबाराला शेजारच्या देशात यॉटवरून काही चांगली वेळ घालविण्यासाठी घेऊन गेला होता. तिथेच त्याला पकडण्यात आले.
5 / 11
मेहुलला अटक झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड बबारा जराबिका देखील पसार झाली आहे.
6 / 11
कॅरेबियन मीडियानुसार बबारा जराबिका एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट सल्लागार आहे. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे. चोक्सीच्या वकिलांनुसार 23 मे रोजी चोक्सी त्याच्या गर्लफ्रेंडला भेटणार होता. याचवेळी अँटिगा पोलीस आणि भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचे अपहरण केले. (Babara Jarabica is a property investment consultant and studied at the London School of Economics.)
7 / 11
यामुळे बबारा जराबिका आणि चोक्सी भेटू शकले नाहीत. मेहुल आणि बबारा हे गेल्या एक वर्षापासून एकत्र होते. ते नेहमी अँटिगाच्या आसपास भेटत असत. या वकिलांनी या दोघांमध्ये नेमके व्यायसायिक, मित्रत्वाचे की आणखी कसले संबंध होते हे सांगितले नाही.
8 / 11
मेहुल चोक्सीची ही हॉट गर्लफ्रेंड एक अलिशान आयुष्य जगते. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती लक्झरी यॉटद्वारे समुद्राच्या लाटांवर मौजमजा करते हे दिसते.
9 / 11
बबारा जराबिकाने स्टेटसमध्ये ट्रॅव्हल, बिझनेस आणि स्पोर्टची आवड असल्याचे म्हटले आहे.
10 / 11
पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सी भारतातून पळ काढत अँटिगा आणि बार्बुडा या देशांमध्ये लपला होता. अँटिगा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल रविवारपासून बेपत्ता होता. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता.
11 / 11
पोलिसांनी मेहुलला रेस्टॉरंटमध्ये जाताना अटक केल्याने तो बबाराला भेटू शकला नाही.
टॅग्स :Punjab National Bank Scamपंजाब नॅशनल बँक घोटाळाPoliceपोलिस