A mexican beauty queen is arrested with links to a kidnapping gang in Mexico
धक्कादायक! ब्युटी क्वीनवर खतरनाक गॅंगची सदस्य असल्याचा आरोप, होऊ शकते ५० वर्षांची शिक्षा! By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 1:46 PM1 / 12मेक्सिकोतील एका ब्युटी क्वीनला पोलिसांनी अटक केली आहे. २५ वर्षीय ब्युटी क्वीनवर आरोप आहे की, ती एका खतरनाक क्रिमिनल गॅंगची सदस्य आहे. मेक्सिको पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. 2 / 12या ८ लोकांमध्ये ब्युटी क्वीन लॉरा मोजिका रोमेरोच्या नावाचाही समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, जर तिच्यावरील आरोप सिद्ध झाले तर तिला ५० वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते.3 / 12मीडिया रिपोर्टनुसार, २५ वर्षीय रोमेरोचा एका अशा गॅंगशी संबंध आहे जी ओएक्साका आणि वेराक्रूजसारख्या शहरांमध्ये किडनॅपिंग करतात. वेराक्रूजमधील स्टेट अटॉर्नीने सांगितले की, या लोकांना ११ फेब्रुवारीला शहरातील एका घरातून अटक करण्यात आली.4 / 12या प्रकरणात सर्वच ८ आरोपींना पुढील दोन महिन्यांसाठी कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 5 / 12बिझनेसमधून ग्रॅज्युएट केलेली रोमेरोने इंग्रजीचं शिक्षण घेतलं आहे. तसेच ती ब्रेस्ट कॅन्सर आणि ल्यूकेमियासारख्या आजारांबाबत जागरूकता करण्यासाठी ओळखली जाते.6 / 12रोमेरोने २०१५ मध्ये मिस अर्थ ओएक्साकाचा किताब जिंकला होता. तसेच ती गेल्यावर्षी इंटरनॅशनल क्वीन ऑफ कॉफीची रनरअपही राहिली होती. 7 / 12तसेच २०१९ मध्ये मिस मेक्सिको स्पर्धेतही तिने भाग घेतला होता आणि यात ती तिसऱ्या क्रमांकावर होती. रोमेरो हे नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांसाठीही चर्चेत असते. 8 / 12रोमेरोने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ती केवळ एक सुंदर चेहऱ्याची महिला नाही तर त्यासोबतच तिच्या पर्सनॅलिटीचा अनेक कंगोरे आहेत. 9 / 12जानेवारी २०१९ मध्ये रोमेरो म्हणाली होती की, आता वेळ आली की, महिलांविरोधातील हिंसा नष्ट करण्याची गरज आहे. महिलांविरोधातील हिंसा कॅम्पेन आणि शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट करत येईल. पुरूषांना हे समजलं पाहिजे की, महिलांविरोधात हिंसा करणं एक संवेदनशील मुद्दा आहे. 10 / 12जानेवारी २०१९ मध्ये रोमेरो म्हणाली होती की, आता वेळ आली की, महिलांविरोधातील हिंसा नष्ट करण्याची गरज आहे. महिलांविरोधातील हिंसा कॅम्पेन आणि शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट करत येईल. पुरूषांना हे समजलं पाहिजे की, महिलांविरोधात हिंसा करणं एक संवेदनशील मुद्दा आहे. 11 / 12जानेवारी २०१९ मध्ये रोमेरो म्हणाली होती की, आता वेळ आली की, महिलांविरोधातील हिंसा नष्ट करण्याची गरज आहे. महिलांविरोधातील हिंसा कॅम्पेन आणि शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट करत येईल. पुरूषांना हे समजलं पाहिजे की, महिलांविरोधात हिंसा करणं एक संवेदनशील मुद्दा आहे. 12 / 12जानेवारी २०१९ मध्ये रोमेरो म्हणाली होती की, आता वेळ आली की, महिलांविरोधातील हिंसा नष्ट करण्याची गरज आहे. महिलांविरोधातील हिंसा कॅम्पेन आणि शिक्षणाच्या माध्यमातून नष्ट करत येईल. पुरूषांना हे समजलं पाहिजे की, महिलांविरोधात हिंसा करणं एक संवेदनशील मुद्दा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications