लांच्छनास्पद! रूममध्ये एकटी होती अल्पवयीन मुलगी; पोलीस इन्स्पेक्टर केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 15:19 IST
1 / 8पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्याने त्याला मुलीसोबत खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते.2 / 8आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केले जाईल आणि पीडितेचे वैद्यकीय तपासणी केली जाईल.3 / 8 खरं तर, बलात्काराचा आरोपी माजी निरीक्षक दिनेश त्रिपाठी अनेक वर्षांपूर्वी कानपूरच्या चाकेरी पोलीस ठाण्यातील पोलीस ठाण्याचे प्रभारी होता. 4 / 8जेव्हा त्याने चकेरीच्या फ्रेंड्स कॉलनीत घर बांधले होते. या घरातच, अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबासह भाड्याने राहत होती.5 / 8पीडितेने केलेल्या आरोपानुसार, दिनेश त्रिपाठी रविवारी रात्री त्याच्या घरी आला, तिथे त्याला खोलीत अल्पवयीन मुलगी एकटीच आढळली आणि त्याच संधीचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला. 6 / 8पोलिसांनी सांगितले की, दिनेश त्रिपाठी यांचे फ्रेंड्स कॉलनीमध्ये एक घर आहे, जिथे पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह भाड्याने राहत होती, मुलीच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला आहे.7 / 8तसे कानपूरमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या बाबत घडलेली ही पहिलीच घटना नाही. दहा वर्षापूर्वीच कानपूरमध्ये, चकेरी सर्कलचे सीओ अमरजीत शाही यांनी पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला धमकी देऊन अनेक दिवस बलात्कार केला, त्यात अमरजीत शाहीला शिक्षाही झाली.8 / 8अवघ्या महिन्यापूर्वी उन्नाव सीओ कृपा शंकर कनोजिया हे एका महिला कॉन्स्टेबलसोबत खोलीत आक्षेपार्ह स्थितीत आढळुन आले, त्यानंतर ज्यांना उन्नाव एसपीने निलंबितही केले.